Jalgaon News : Angioplastyसाठी आजोबांनी गाठले तब्बल 185 किलोमीटरचे अंतर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

angioplasty

Jalgaon News : Angioplastyसाठी आजोबांनी गाठले तब्बल 185 किलोमीटरचे अंतर!

जळगाव : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील गावापासून ते गोदावरीपर्यंतचे तब्बल १८५ किलोमीटरचे अंतर पार करत उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या ६० वर्षीय आजोबांची तत्काळ ॲन्जिओप्लास्टी करत डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांनी रुग्णाला जीवनदान दिले. (by angioplasty old man gets new life at akola jalgaon news)

व्यवसायाने शेतीकाम करणाऱ्या गरीब कुटुंबातील ६० वर्षीय श्रीराम आवटे यांना चालताना दम लागणे, छाती धडधडणे, अशा समस्या होत्या. स्थानिक ठिकाणी डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रिया सांगितल्यानंतर त्यांनी लगेचच गोदावरीतील रुग्णालय गाठले.

तेथे डॉ. वैभव पाटील यांनी रुग्णाची तपासणी करून तत्काळ ॲन्जिओप्लास्टी करावी लागेल, मधुमेहामुळे रिस्क आहे; परंतु आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असा धीर नातलगांना दिला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

नंतर यशस्वीपणे ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली. तत्काळ उपचारामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

"हृदयविकार येण्यापूर्वी अनेक संकेत मिळत असतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच हृदयविकारतज्ज्ञांकडून तपासणीसह उपचार करून घ्यावेत." -डॉ. वैभव पाटील

टॅग्स :JalgaonangioplastyOld Age