Jalgaon : लग्न समारंभाला आलेल्या कुटुंबाची कार उलटली

Car Accident
Car Accidentesakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : पिळोदे (ता. अमळनेर) येथे विवाह सोहळ्याला (Wedding Ceremony) आलेल्या रत्नागिरी येथील केंद्र प्रमुखांची कार गांधली- अमळनेर रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात (Accident) कारमधील चौघे जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. (car accident of family who came to attend wedding ceremony Jalgaon News)

Car Accident
पोलिस दलाकडून 2 दिवसात 400 जणांवर कारवाई

पिळोदे येथील मूळ रहिवासी भगवान मोरे हे रत्नागिरी येथे केंद्र प्रमुख आहेत. ते नातेवाईकाच्या लग्न समारंभानिमित्त गावी आले होते. आपल्या चारचाकी वाहनातून पत्नी, पुतणी व चुलतभाऊ असे धुळ्याला जात असताना गांधली गावाच्यापुढे अचानक रस्त्याच्या बाजूला त्यांचे चारचाकी वाहन उलटले. यात कारमधील भगवान मोरे यांच्यासह सर्वच जण दाबले गेले. कार उलटली त्यावेळी रस्त्याने जाणारे अविनाश पवार, बंटी बोरसे, जनार्दन कोळी व भूषण सूर्यवंशी यांच्यासह इतरांनी लगेचच कारच्या दिशेने तत्काळ धाव घेत गाडीमध्ये दबलेल्या सर्वांना बाहेर काढून अमळनेरला खाजगी रुग्णालयात दाखल केले. यातील एकाला गंभीर मार बसल्याची माहिती मिळाली असून या अपघातप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.

Car Accident
धुळे : चोरीची कार घेणाऱ्यास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com