Mehrun Track Accidental Death Case : अल्पवयीन कारचालकासह पित्यावर गुन्हा दाखल | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Late Vikrant mishra

Mehrun Track Accidental Death Case : अल्पवयीन कारचालकासह पित्यावर गुन्हा दाखल

जळगाव : मेहरुण ट्रॅकवरील कार रेसिंगमध्ये विक्रांत मिश्रा या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. पोलिसांत इनोव्हा कारमालकासह चालक असलेल्या त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घडल्या प्रकारामुळे परिसरातील रहिवासी आणि जळगावकरांनी सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त केला.

त्यावर तातडीने मेहरुण ट्रॅकवर पोलिस चौकी उभारण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अनुकूलता दर्शवली आहे. (Car Racing Accident Death Case filed against father along with minor driver jalgaon Latest Marathi News)

शहरातील एकमेव पर्यटनस्थळ असलेल्या मेहरुण तलावालगत जॉगिंग ट्रॅकवर सुसाट कार चालकाने सायकलस्वार शाळकरी मुलास चिरडून ठार केल्याची घटना रविवारी (ता. २८) घडली होती. या अपघातानंतर कारमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार रेसिंगमध्ये सहभागी झालेले हे तिघेही अल्पवयीन आहेत. याबाबत चालकाला दाखल गुन्ह्यात ताब्यात घेत बालन्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरित दोघांना कायदेशीर समज देवून सोडण्यात आले.

मुलासह पित्यावर गुन्हा दाखल

विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) या शाळकरी मुलाला समोरुन धडक देणाऱ्या कार (एमएच १९ बी. यू. ६००६) मालक सलीम शहा याच्याविरुद्ध कलम ३०४(२),२४९, मोटारवाहन कायदा कलम-१८४, अ,ब,३,४,५,१८१ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अपघाताला कारणीभूत कार पोलिसांनी जप्त केली असून कारचालक तरुणाचा पिता बाहेरगावी असल्याचे त्याच्याशी संपर्क करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: भाटगाव येथील 2 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

लायसन्स... तपासणीला राजकीय अवरोध

शहरात सुसाट दुचाकी-चारचाकी वाहने पळवणाऱ्यांमध्ये बहुसंख्य अल्पवयीन आढळून येतात. नाकाबंदी दरम्यान पोलिस त्यांना थांबवताही मात्र, कारवाई करु नये म्हणून राजकीय पुढाऱ्यांसह चक्क आमदार, मंत्र्यांचे पीए संबंधित पोलिसांना फोन करुन सोडवण्यास सांगत असल्याचा वाहतूक पोलिसांचा अनुभव आहे.

जळगावकरांचा संताप

मेहरुण चौपाटीवर विक्रांत मिश्रा या बालकाच्या मृत्यूनंतर कालच संध्याकाळी संतप्त जमावाने कारचालकासह त्याच्या मित्रांना जिल्‍हा रुग्णालयातच बदडून काढले. असाच संताप आज दिवसभरापासून व्हॉटस्‌ॲप, फेसबूक सारख्या सोशल मीडियावर नेटिझन्सने व्यक्त केला. विक्रांतच्या मृत्यूने समाजमन पूर्णतः ढवळून निघाले आहे.

सर्वच स्थानिक वृत्तपत्रांनी या घटनेकडे प्रशासनासह जळगावकरांचे लक्ष वेधले. सकाळ पासूनच विविध सोशल मीडिया प्लॅटफार्मवर विक्रांतच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करण्यासह, रईसजाद्यांवर संताप तर, यंत्रणेला लक्ष केल्याच्या कमेंट नमूद झाल्या. जळगावच्या मेहरुण ट्रॅकवरील परिस्थितीचा उहापोह यावेळी काहींनी मांडला.

पोलिस चौकी उभारणार : डॉ. प्रवीण मुंडे

मेहरुण ट्रॅकवर पोलिसांची नियमित गस्त असते..तरी, एकूणच परिस्थिती पाहता उपलब्ध मनुष्यबळाला अनुसरून या ठिकाणी पोलिस चौकी उभारली जाईल.

हेही वाचा: Nashik : शहरभर ट्रॅफिक जाम

Web Title: Car Racing Accident Death Case Filed Against Father Along With Minor Driver Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..