esakal | अमळनेरला उद्यापासून तीन दिवस कडकडीत बंद ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अमळनेरला उद्यापासून तीन दिवस कडकडीत बंद ! 

ॲन्टिजेन चाचण्या केल्या जात असताना बाजारात अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे.

अमळनेरला उद्यापासून तीन दिवस कडकडीत बंद ! 

sakal_logo
By
योगेश महाजन

अमळनेर ः गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने २० आणि २१ मार्च रोजी अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश इंसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत तर २२ ला पालिकेने ‘जनता कफ्यू’ आणि ‘नो व्हेईकल डे’चे आदेश दिल्याने सतत तीन दिवस अमळनेर बंद राहणार आहे. 

आवर्जून वाचा- सांगलीसारखाच भाजपचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम जळगावात; शिवसेनेचा डाव चालला, महापौरपदी जयश्री महाजन
 


दररोज शहराच्या विविध भागात ॲन्टिजेन चाचण्या केल्या जात असताना बाजारात अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने साखळी तोडण्यासाठी सीमा अहिरे यांनी हा निर्णय घेतला आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची असणार आहे. 

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार, भादंवि १८६० च्या ४५ कलम १८८ प्रमाणे व फौजदारी संहिता १९७३ च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोमवारी (ता. २२) आठवडे बाजार तर पालिकेच्या उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या आदेशाने ‘जनता कर्फ्यू’चे व ‘नो व्हेईकल डे’चे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी दूध, कृषी व्यवसाय आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. 

आवश्य वाचा- ठाकरे- खडसेंमधील संवादातून फोडाफोडीला प्रारंभ अन्‌ घडले सत्‍तांतर नाट्य

..हे राहील बंद 
२० व २१ मार्चला सर्व बाजारपेठ, किराणा दुकान, किरकोळ भाजीपाला खरेदी विक्री, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सभा, कार्यक्रम, मेळावे, बैठक, शॉपिंग मॉल, सलून, पानटपरी, हातगाड्या, हॉटेल, बगीचा, व्यायामशाळा, नाट्यगृह, लिकर शॉप्स, सर्व काही बंद राहणार आहे. 

...हे सुरू राहील 
पार्सल सेवा, दूध विक्री, रुग्णवाहिका सेवा, औषधी दुकाने, दवाखाने, आपत्ती व्यवस्थापन घटक आदी सेवा सुरू राहणार आहेत. 

..अन् निघाले सुधारित आदेश 
प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांनी आधी १९ ते २१ मार्च असा तीन दिवसांचा लॉकडाउन घोषित केला होता. परंतु अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली. चर्चेनंतर पुन्हा सुधारित आदेश काढून एक दिवस हा निर्णय पुढे ढकलून २० ते २२ मार्चचा उल्लेख केला. 

कृउबाचे व्यवहारही राहणार बंद 
बाजार समितीने देखील लॉकडाऊउनच्या काळात आपले सर्व व्यवहार बंद राहतील, असे कळविले आहे. आधीच बँकांच्या संपामुळे बाजार समिती बंद होती. त्यात पुन्हा ३ दिवस बंद असल्यामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image