Latest Marathi News | पाळीव कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : पाळीव कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील मेहरुण तलाव परिसरातील गायत्रीनगरात एका पाळीव कुत्र्याने वाहनचालकाला चावा घेतला. कुत्रा घेऊन फिरवायला निघालेल्या कुत्र्याच्या मालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गायत्रीनगरातील रहिवासी मुकेश अशोक सुर्वे (वय ४४) वाहनचालक आहेत. रविवारी (ता. ११) रात्री साडेनऊला गायत्रीनगरातून रस्त्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवत असताना, श्री. नाथाणी पाळीव कुत्रा घेऊन जात होते. (Case has been filed against owner for biting a pet dog Jalgaon Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Jalgaon Crime News : वशीकरणाच्या उताऱ्यासाठी बाबाला दिले 50 हजार

या कुत्र्याला मालकाने मुकेश सुर्वे यांच्याकडे पाहून ‘छू’ म्हटले. ‘छू’ म्हणताच कुत्रा सुर्वे यांच्या अंगावर धावून आला. या कुत्र्याने सुर्वे यांना चावा घेतला, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही चावा घेतला.

यात मुकेश सुर्वे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुकेश सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत नाथणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सचिन पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime News : Pan Card Update करण्याच्या बहाण्याने फसवणुक