जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोख कर्ज | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतीश पाटील : जिल्हा बँक सहकार पॅनल मेळावा

जळगाव : जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोख कर्ज

चोपडा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, आता शेतकऱ्यांना एटीएम दिसणार नाही शेतकऱ्यांना रोख स्वरूपात कर्ज दिले जाईल, अशी ग्वाही माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी दिली

चोपडा येथे जिल्हा बँक सहकार पॅनलचा मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार लता सोनवणे, ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, चोसाकाचे माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, जिल्हा दूध संघ संचालक ए. डी. चौधरी, सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार घनश्याम अग्रवाल, इंदिरा पाटील, विजया पाटील, गोरख पाटील, गिरीश पाटील, तिलोत्तमा पाटील, चोसाकाचे माजी अध्यक्षा निता पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जि. प. सदस्या निलम पाटील, पं. स. सदस्य कल्पना पाटील, माजी सभापती गोकूळ पाटील, महाविकास आघाडी उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा: 29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

बॅंक नावलौकिकास येईल

ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर म्हणाल्या, बँकेसाठी काही कठोर निर्णय घेतले. बॅंक पुढील १०० वर्ष कशी टिकेल याचा विचार केला. सुरुवातीला बँकेची परिस्थिती वाईट होती. जिल्ह्यात सहकार मोडकळीस आले असताना दगडी बँक भविष्यात नावलौकिकात येईल. ज्या बँकेला ६०० कोटींची अनिष्ट तफावत होती ती १०० कोटींवर आली. ‘क’ दर्जाची होती तिला ‘ब’ दर्जा मिळवून दिला.

loading image
go to top