29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना | Pakistan to host Champions Trophy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

आता २९ वर्षानंतर २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आय़सीसीने जाहीर केले आहे.

29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयसीसीने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये येत्या १२ वर्षांमध्ये कोणत्या देशात कोणती स्पर्धा होणार आहे हे जाहीर करण्यात आलं आहे. भारतात २०२६ मध्ये टी२० वर्ल्डकप तर २०२९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१ मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आयसीसीने केलेल्या घोषणेत आणखी एक बाब सध्या चर्चेत आहे ती म्हणजे २०२४ चा टी २० वर्ल्डकप पाकिस्तानमध्ये होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आय़सीसीने कोणतीही मोठी स्पर्धा भरवलेली नाही. १९९६ च्या वर्ल्ड कपनंतर सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये आयसीसीच्या स्पर्धा खेळवल्या जात नव्हत्या.

आता २९ वर्षानंतर २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आय़सीसीने जाहीर केले आहे. मात्र आता क्रिकेट विश्वात कोणते देश पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्यातून नुकतीच माघार घेतली होती. त्यामुळे आता कोणता देश पाकिस्तानमध्ये खेळायला तयार होणार हे पहावं लागेल.

हेही वाचा: या शहरात खेळला जाईल अंतिम सामना; ७ शहरात होणार ४५ सामने

दरम्यान, आय़सीसीने याबाबतची घोषणा केल्यानतंर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पीसीबीचे प्रमुख रमीज राजा यांनी ट्विटरवरून आनंद व्यक्त केला आहे. रमीज राजा यांनी म्हटलं की, ही खूप अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे की, पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद भूषवणार आहे. लाखो पाकिस्तानी चाहते, प्रवासी आणि जागतिक चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरेल. तसंच जगाला आमचा पाहुणचारसुद्धा पाहता येईल असं रमीज राजा यांनी म्हटलं.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही ट्विट केलं आहे. अख्तरने ट्विटरवर म्हटलं की, पाकिस्तानला २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाल्याचं ऐकून खूपच आनंदी झालो.

पाकिस्तानमध्ये तब्बल २९ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आयसीसीची मोठी स्पर्धा होणार आहे. पाकचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनेसुद्धा ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की, पीसीबी आणि चाहत्यांचे अभिनंदन, हे पाकिस्तानी खेळाडूंना घरच्या मैदानावर ही स्पर्धा जिंकण्यासाठी मोठं प्रोत्साहन असणार आहे.

loading image
go to top