Jalgaon News : Market Fee वरून CCIची कापूस खरेदी रखडली

Cotton Sale News
Cotton Sale Newsesakal

जळगाव : जिल्ह्यात ‘सीसीआय’ला कापूस खरेदीचा मुहूर्त अद्यापही सापडत नसल्याचे चित्र आहे. मार्केट शुल्क ५५ पैसे असावे, या मुद्यावरून ही खरेदी रखडली आहे. यामुळे अद्यापही कापसाची जिल्ह्यात विक्री सुरू नाही. जी होते, ती अत्यल्प आहे.

बाजारात कपाशीला काही दिवसांपूर्वी साडेआठ ते नऊ हजारांचा दर मिळत होता. आता तोही दर कमी होऊन तो साडेसात ते आठ हजार रुपये झाला आहे. यामुळे शेतकरी कापसाच्या दराबाबत अधिकच संभ्रमित झाले आहेत. (CCI purchase of cotton from Market Fee stopped Jalgaon News)

Cotton Sale News
Jalgaon News : ‘कोरोना’ लाटेच्या पार्श्वभूमीवर GMC सज्ज

गेल्या वर्षी कापसाला १० ते १३ हजारांचा दर मिळाला होता. तो यंदाही मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यामुळे शेतकरी बाजारात कापूस विक्रीस आणत नसल्याचे चित्र आहे.

‘सीसीआय’ने या हप्त्यापासून खुल्या बाजारपेठेत उतरून कापूस खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही कापूस खरेदीची केंद्रे सुरू केलेली नाहीत.‘सीसीआय’ने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदी करू, असे सांगतानाच आठ हजार ४०० रुपये दर देण्याचेही सांगितले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, आठ दिवसांनंतरही ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू केलेली नाही.

‘सीसीआय’ कापूस खरेदी करताना जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांनी मार्केट शुल्क एक रुपये पाच पैशांऐवजी केवळ ५५ लावावे, असे पत्र ‘सीसीआय’ने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. त्यावरून जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या प्रशासकांची बैठक बोलावून शुल्क ५५ पैसे करण्यावर चर्चा केली. मात्र, हे शुल्क राज्य शासनाने ठरवून दिले आहे. राज्य शासनाने ते मान्य केले, तर आम्हाला हरकत नाही, असेही प्रशासकांनी सांगितले.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Cotton Sale News
Jalgaon News : भाजपचा महासभेत गदारोळ, निषेध ठरावाने संपले आंदोलन

त्यावरून राज्य शासनाकडे ५५ पैशांबाबत पत्र पाठवू. शासन जो निर्णय घेईल, तो बाजार समित्यांना मान्य असेल, असे जिल्हा उपनिबंधकांनी ‘सीसीआय’ला पत्र पाठवून सांगितले. मात्र, त्यावर आम्ही ५५ पैसेच मार्केट फी घेऊ, असे आम्हाला लिहून द्या, तरच कापूस खरेदी सुरू होईल, असे पत्र ‘सीसीआय’ने जिल्हा उपनिबंधकांना पाठविले आहे.

यामुळे जोपर्यंत शासन ५५ पैशांच्या मार्केट शुल्काला होकार देत नाही, तोपर्यंत कापूस खरेदी होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस उत्पादक प्रचंड अडचणीत आले आहेत. कापसाला दहा ते १३ हजारांची मागणी आपण केली. मात्र, अद्यापही तो दर मिळत नाही. शेतकऱ्यांचा कापूस ८० ते ९० टक्के घरात आला आहे.

रब्बी हंगामातील पिकेही तयार होताहेत. मग घरातील कापूस कोठे विकायचा? दराचे काय आदी अनेक प्रश्‍न कापूस उत्पादकांसमोर आहेत. ‘सीसीआय’ने खरेदी केल्यास शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा व दराचा प्रश्‍न सुटणार आहे. प्रतीक्षा आहे, ती खरेदी केंद्रे सुरू होण्याची...

Cotton Sale News
Jalgaon News : अमळनेरला विभागीय स्पर्धेत 162 क्रीडापटूंचा सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com