Jalgaon News : भगवा चौकात CCTV ची नजर; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकसहभागातून सुविधा

Amalner: At the inauguration ceremony of CCTV cameras, Dr. Anil Shinde, Branch Manager of Union Bank Shrikant Bhusare, Deputy Superintendent of Police Rakesh Jadhav, Uday Patil etc
Amalner: At the inauguration ceremony of CCTV cameras, Dr. Anil Shinde, Branch Manager of Union Bank Shrikant Bhusare, Deputy Superintendent of Police Rakesh Jadhav, Uday Patil etcesakal

अमळनेर : शहरातील भगवा चौक परिसरातील नागरिकांसह महिला, महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

भगवा चौक परिसरात नर्मदा फाउंडेशन, युनियन बॅँक, एसएनडीटी महिला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयासह मोठ्या प्रमाणात कॉलनी परिसरही आहे.

हॉस्पिटल आवारात काही अनुचित प्रकार घडू नये, बॅँकेतून बाहेर आलेल्या ग्राहकांची लुटमार होऊ नये, महिला महाविद्यालय व कन्या विद्यालय आवारात विद्यार्थिनींसोबत काही गैरप्रकार घडू नयेत, तसेच कॉलनी परिसरात घरफोडीसारख्या घटना घडू नयेत. (CCTV implemented Saffron Chowk in amalner Facilitation through public participation for citizen safety Jalgaon News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Amalner: At the inauguration ceremony of CCTV cameras, Dr. Anil Shinde, Branch Manager of Union Bank Shrikant Bhusare, Deputy Superintendent of Police Rakesh Jadhav, Uday Patil etc
Jalgaon News : महेंद्र केदार यांना अटकपूर्व जामीन

एकंदरीत सर्वप्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी लोकसहभागातून या भागात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले आहेत.

लोकार्पण सोहळा

कॅमेऱ्याचे लोकार्पण सोहळा डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. युनियन बॅँकेचे शाखाव्यवस्थापक श्रीकांत भुसारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, डॉ. संदीप जोशी, डॉ. शरद बाविस्कर, प्रा. श्‍याम पवार, गोपाल कुंभार, युनियन बॅँकेचे उदय पाटील, संभाजी पाटील, अमित ललवाणी, महेंद्र महाजन, सईद तेली, बापूराव ठाकरे, नरेंद्र पाटील, जयंत पाटील, प्रवीण महाजन, दीपक काटे आदी उपस्थित होते. रवींद्र मोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Amalner: At the inauguration ceremony of CCTV cameras, Dr. Anil Shinde, Branch Manager of Union Bank Shrikant Bhusare, Deputy Superintendent of Police Rakesh Jadhav, Uday Patil etc
Jalgaon News : खुनाच्या खटल्यातील 13 जणांची निर्दोष मुक्तता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com