Jalgaon News : खुनाच्या खटल्यातील 13 जणांची निर्दोष मुक्तता

murder case result news
murder case result newsesakal

अमळनेर : शहरातील बंगाली फाईल ख्वॉजानगर परिसरात १० एप्रिल २०२० ला झालेल्या राकेश चव्हाण खून खटल्यातील १३ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

अमळनेर शहरात १० एप्रिल २०२० ला ख्वॉजानगर बंगाली फैल भागात सायंकाळी शहरातील कुख्यात सराईत गुन्हेगाराचा काही लोकांनी खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण तेरा जणांना संशयाच्या आधारावर अटक केली होती. (In case of murder 13 people acquitted Jalgaon Crime News)

murder case result news
Jalgaon News : भंगार बाजारातील 85 टपऱ्या हटविल्या; पोलिस बंदोबस्तात कारवाई

त्या पैकी ९ जणांना अमळनेर सत्र न्यायालयाने जामीनावर मुक्त केले होते आणि यातील ४ जणांचा जामीन नाकारला होता, तेव्हापासून कैदेत असलेले ४ जण आणि जामिनावर सुटलेले ९ अशा एकूण १३ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी ३ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली होती. सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. तथापि संशयितांविरुद्ध सबळ पुरावा न मिळून आल्याने अमळनेर सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी वरील सर्व १३ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात फिर्याद ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

murder case result news
Jalgaon District Bank : देवकरांचा राजीनामा, ॲड. पाटील, पवार चर्चेत

या खुनाची घटना ही कोरोना काळात घडलेली होती. मृताचा खून एका ५ फूट लांब आणि साधारणतः साडेचार इंच गोलाई असलेल्या ओल्या ओंडक्याने डोक्यावर निर्घृणपणे वार करून करण्यात आला होता.

घटनेने संपूर्ण अमळनेर शहर हादरले होते. दरम्यान राकेश चव्हाण , राज चव्हाण, नाना गोयकर यांच्यासह पाच जणांवर धार्मिक स्थळावर दगडफेकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याही संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

संवेदनशील घटना असल्याने निकाल देताना विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या खटल्यात संशयितांतर्फे वकील अकील इस्माईल, वकील शकील काझी, वकील महेश बागूल आणि सलिम खान यांनी काम पाहिले.

murder case result news
Jalgaon News : धुळे -औरंगाबाद बायपासवरील दुभाजक काढण्यासाठी ‘रास्तारोको’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com