Bazar Samiti Result : चाळीसगाव बाजार समितीत भाजपची सरशी

A crowd of activists gathered outside the election counting office to listen to the results.
A crowd of activists gathered outside the election counting office to listen to the results. esakal

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शनिवारी दुपारी अडीचला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर केले.

तेव्हा आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनलला १३ व महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला ५ जागा मिळाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली. (Chalisgaon Market Committee BJP Mangesh Chavan shetkari sahakar panel won election jalgaon news)

नंतर फेरमतमोजणीचा निकाल सायंकाळी सहाला जाहीर करण्यात आला. तेव्हा निकाल जाहीर करताना आमदार चव्हाण यांच्या पॅनलला १५ व महाविकास आघाडीला ३ जागा मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.

फेरमतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते ‘महानंदा’चे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयासमोर एक तास तास ठिय्या आंदोलन केले.

अगोदर विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या महिला उमदेवार रत्नाबाई पाटील नंतर पराभूत झाल्याचे जाहीर झाल्याने त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दबावाखाली निकाल दिल्याचे ठिय्या आंदोलनात सांगितले

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A crowd of activists gathered outside the election counting office to listen to the results.
Parola Market Committee Result : पारोळा बाजार समितीवर ‘मविआ’चे वर्चस्व

फेरमतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलचे सोसायटी गटातील सागर शशिकांत साळुंखे व शेतकरी सहकार पॅनलचे शैलेंद्रसिंग पाटील यांना समसमान ४४० मते मिळाली आणि ईश्वरचिट्टीमध्ये पाटील यांची चिट्ठी निघाल्याने ते विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच महिला गटामध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवार विजयी झाल्या होत्या.

मात्र त्यामध्ये रत्नाबाई पाटील यांना ४८८ व आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकार पॅनलच्या वनिताबाई पाटील यांना ४८५ मते मिळाली होती. मात्र वनिताबाई यांनी हरकत घेतली आणि फेरमतमोजणीमध्ये रत्नाबाई यांची मते कमी होऊन वनिताबाई (मते ४८८) यांची मते वाढल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. अशाप्रकारे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले.

दोन्ही पॅनलचे विजयी उमेदवार

शेतकरी सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते अशी: सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ -किशोर पाटील (५३०), कपिल पाटील (५०४), रवींद्र शिवराम पाटील (४७७), प्रदीप पाटील (४७६), शैलेंद्रसिंग पाटील (४४०), नवल पवार (४६०), सोसायटी -इतर मागास वर्ग मतदारसंघ रविंद्र चुडामण पाटील (५३२),

A crowd of activists gathered outside the election counting office to listen to the results.
Jalgaon Bazar Samiti Result : चिमणरावांचा गड पडला, महाजन, चव्हाण, सावकारे,चौधरींचे वर्चस्व

विशेष जाती भटक्या जाती मतदार संघ मच्छिन्द्र राठोड (५३९). ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण राहुल पाटील (६०७), हेमराज पाटील (६३६), अनुसूचित जाती जमाती मतदार संघ प्रभाकर जाधव (५३२),आर्थिक दुर्बल घटक साहेबराव राठोड (५९१). व्यापारी मतदारसंघ नीलेश वाणी तथा पप्पूशेठ (७८), प्रभाकर घुमरे (८२). महिला राखीव मतदारसंघ : वनिता पाटील (४८८)

महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांची नावे अशी : सोसायटी सर्वसाधाणमतदारसंघ : दिनेश पाटील (४७३), महिला राखीव मतदार संघ : चंद्रकला छगन पाटील (५३१), व्यापारी मतदार संघ : प्रदीप देशमुख (८३).

A crowd of activists gathered outside the election counting office to listen to the results.
Jalgaon Bazar Samiti Result : भुसावळला भाजपचे वर्चस्व; ‘मविआ’ला केवळ 3 जागा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com