Chandrashekhar Bawankule: ५२७ वर्षांनंतर अयोध्येत जगातील सर्वांत मोठी दिवाळी,त्यामुळे प्रत्येक हिंदू बांधवाने...

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankuleesakal

Chandrashekhar Bawankule : अयोध्येत प्रभू श्रीरामांची मूर्ती २२ जानेवारी २०२४ ला मंदिरात विराजमान होत असून, तब्बल ५२७ वर्षांनंतर अयोध्येत जगातील सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू बांधवाने या दिवशी आपल्या घरात दिवा लावावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुसावळ येथे केले.

शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळात गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी त्यांनी सुपर वॉरियर्सशी संवाद साधला. तसेच, भुसावळ, चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघांबाबत बैठकही घेतली. (Chandrashekhar Bawankule statement Diwali in Ayodhya after 527 years jalgaon news)

त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत ‘घर घर चलो’ अभियान व २५० मीटरची फेरी काढण्यात आली. अग्रभागी भजनी मंडळ, डीजेचा ताल व भगव्या फेटेदारी महिलांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष केल्याने सिंधी कॉलनीत भाजपमय वातावरण निर्माण झाले.

बडा सेवा मंडळातील कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत २०२४ साठी महाविजय फेरी काढण्यात आली. तसेच, ‘घर घर चलो’ अभियानांतर्गत बावनकुळे यांनी रवी फॅन्सिंगवाले यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी बावनकुळे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

तसेच, विविध समाजाच्या शिष्टमंडळांतर्फे त्यांना निवेदन देऊन पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शविण्यात आला.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule: देशात 2 कायदे आणण्याचे ‘पाप’ काँग्रेसचे : चंद्रशेखर बावनकुळे

सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या कॉर्नर सभेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, की २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरात विराजमान होत असून, या दिवशी देशातील सर्वांत मोठी दिवाळी असेल. प्रत्येक हिंदू बांधवाने या वेळी घरात दिवा लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

...ही तर जनतेची इच्छा : खासदार खडसे

खासदार खडसे म्हणाल्या, की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही जनतेची इच्छा आहे. पुढील निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. भुसावळ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे त्या म्हणाल्या.

मोदींचे हात आणखी बळकट करणार : आमदार सावकारे

आमदार सावकारे म्हणाले, की आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी भाजपला मतदान करून भाजपचे हात बळकट करायचे आहेत. कठोर विषयातून मोदीजींनी देशात आदर्श निर्माण केला आहे. देशाला मजबूत करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करावेत.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : ‘वानखेडे'मध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांची शपथ : चंद्रशेखर बावनकुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com