Jalgaon Municipality News: महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल; नवीन अधिकारी रुजू झाल्याने पदांचे झाले वाटप

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत रुजू झाल्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल करण्यात आला आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत रुजू झाल्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल करण्यात आला आहे. या बाबतचा निर्णय आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवारी (ता. २७) घेतला.

सामान्य प्रशासनाचा कार्यभार आता अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे आता आरोग्य विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. (Changes in duties of municipal officers jalgaon news)

महापालिकेत आता सरकारी अधिकाऱ्यांच्या सर्व रिक्त जागांवर सरकारने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

खर्चाचे अधिकार

आयुक्तांनी बुधवारी (ता.२७) खर्चाचे अधिकार आदेश जारी केले आहेत. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना तीन लाखांपर्यंतच्या, तर सहाय्यक आयुक्तांना एक लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे व सर्व प्रकारच्या आर्थिक बिलांवर स्वाक्षरी करण्याचे वित्तीय अधिकारी दिले आहेत.

अधिकाऱ्यांकडील कार्यभार

० अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत-सामान्य प्रशासन, अंतर्गत प्रमुख कार्यालय जनगणना, अभिलेखे, बारनिशी, जनसंपर्क, दूरध्वनी, प्रकल्प विभाग, पाणीपुरवठा विभाग, भांडार विभाग, क्रीडा

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : डोणगावची कन्या बनली सहकार खात्याची अधिकारी; ‘MPSC’त यश

० उपायुक्त अविनाश गांगोडे-आरोग्य, स्वच्छता, मलेरिया, दवाखाना, अतिक्रमण, आस्थापना, शिक्षण, अग्निशमन, निवडणूक

० उपायुक्त निर्मला गायकवाड-महसूल, प्रभाग समिती क्रमांक एक ते चार, मार्केट वसुली, खुला भूखंड विभाग, घरकूल, एलबीटी, मिळकत व्यवस्थापन विभाग, महिला व बालकल्याण, दिव्यांग विभाग, एनयूएलएम

० सहाय्यक आयुक्त गणेश चाटे- महसूल, प्रभाग समिती एक ते चार, मार्केट वसुली, खुला भूखंड विभाग, घरकूल, एलबीटी, मिळकत व्यवस्थापन विभाग, महिला व बालकल्याण, दिव्यांग विभाग, एनयूएलएम (समन्वय अधिकारी म्हणून महसूल उपायुक्त हे काम पाहतील)

० सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर-आस्थापना, शिक्षण (समन्वयक अधिकारी उपायुक्त आरोग्य), भांडार, क्रीडा, ग्रंथालय, विधी (समन्वय अधिकारी अतिरिक्त आयुक्त)

० सहाय्यक आयुक्त अश्‍विनी गायकवाड- बांधकाम, विद्युत विभाग (समन्वय अधिकारी आयुक्त)

० सहाय्यक आयुक्त उदय पाटील-दवाखाना, मलेरिया (समन्वय अधिकारी आरोग्य आरोग्य)

Jalgaon Municipal Corporation
Vidrohi Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथे 3 फेब्रुवारीपासून विद्रोही मराठी साहित्य संमेलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com