Jalgaon News : प्रधानमंत्री योजनेच्या वारसांना धनादेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Checks to heirs of Pradhan Mantri Yojana jalgaon news

Jalgaon News : प्रधानमंत्री योजनेच्या वारसांना धनादेश

नांद्रा (जि. जळगाव) : येथील बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रा येथील परिसरातील खातेदारांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) व प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना यांचे १२ रुपये व ३३० रुपये, असे विमा काढलेले आहेत.

यामध्येच काही दिवसांपूर्वी आसनखेडा येथील प्रभाकर आधार पाटील यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. (Checks to heirs of Pradhan Mantri Yojana jalgaon news)

त्यांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (१२ रुपये) व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (३३० रुपये) असे दोन विमा त्यांनी काढले होते. त्यामुळे त्यांच्या वारस पत्नी सुवर्णा प्रभाकर पाटील यांना एकूण प्रत्येकी दोन लाख असा चार लाखांचा धनादेश येथील मृत समाधान सजन पाटील यांचाही अपघातात मृत्यू झाला होता.

त्यांचाही १२ रुपयाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढला असल्याने त्यांची वारस पत्नी कमलबाई पाटील यांनाही दोन लाखाचा धनादेश आज सरपंच बंटी सूर्यवंशी, माजी सभापती नितीन तावडे, मंडळ अधिकारी प्रशांत पगार यांच्या हस्ते बँकेत देण्यात आला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

याप्रसंगी गावातील उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे, विनोद तावडे, योगेश सूर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर, आनंदा बाविस्कर, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बँक व्यवस्थापक आकाश खरात, बँक अधिकारी दीपक गुप्ता, सुहास सपकाळे, श्रेयस साळी, बँक मित्र दिलीप पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.