Gudi Padwa 2023 : हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत; विविध चित्ररथांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

gudi padwa 2023 New Year Swagat Yatra organized on behalf of Hindu Varsh Swagat Samiti jalgaon news
gudi padwa 2023 New Year Swagat Yatra organized on behalf of Hindu Varsh Swagat Samiti jalgaon newsesakal

अमळनेर (जि. जळगाव) : येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने आयोजित नववर्ष स्वागत यात्रा (Gudi Padwa 2023) उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झाली.

विविध विषयांवरील चित्ररथ व तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. (gudi padwa 2023 New Year Swagat Yatra organized on behalf of Hindu Varsh Swagat Samiti jalgaon news)

प्रताप मिल कंपाउंडमधील बन्सीलाल पॅलेस येथे पालखी व गुढीचे पूजन करून मिरवणुकीस सुरूवात झाली. स्टेशन रोड, स्वामी नारायण मंदिर, सिंधी बाजार, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, सराफ बाजार, वाडी चौक, माळी वाडा, बहादरपूर रोड, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक, बसस्थानक मार्गे जिल्हा परिषद विश्रामगृह येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. समारोपप्रसंगी प्रास्ताविक बजरंगलाल अग्रवाल यांनी केले. दिनेश नाईक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. बोरकर व सहकाऱ्यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या स्वागत मिरवणुकीत गायत्री परिवार यांची पालखी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाडी संस्थान, स्वामी नारायण मंदिर संस्था, मंगळग्रह सेवा संस्था, मोठे बाबा मंदिर संस्था, जळगाव जनता बॅंक, गोशाळा, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, प्रताप कॉलेज, फार्मसी कॉलेज, प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवार, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, जनसेवा फाऊंडेशन, जळगाव पीपल्स बॅंक, नगरपालिका, अमळनेर अर्बन बॅंक,

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

gudi padwa 2023 New Year Swagat Yatra organized on behalf of Hindu Varsh Swagat Samiti jalgaon news
OTP Fraud Crime : एफडी’तून पावणेआठ लाख लंपास

माळी समाज संस्था, महावीर युवा परिषद, विश्वकर्मा मित्रमंडळ, ॲबॅकस, मंगलादेवी चौक मित्रमंडळ, गजानन महाराज सेवक मंडळ, अग्रसेन महाराज समाज मंडळ, ज्ञानेश्वर पाठशाळा, माजी सैनिकांचे खानदेश रक्षक दल, वारकरी शिक्षण संस्था, हरिओमसेवक परिवार यांचे विविध विषयांवरील प्रबोधनपर चित्ररथ, तसेच विजयनाना पाटील आर्मी स्कूल, खानदेश शिक्षण मंडळाचे फार्मसी कॉलेज, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या वेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सुभाष भांडारकर, खा. शि. मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, नीरज अग्रवाल, उद्योजक ओमप्रकाश मुंदडा, डॉ. चंद्रकांत पाटील, अॅड. व्ही. आर. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,

पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, प्रा. धर्मसिंह पाटील, अशोक पाटील, पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत, लालचंद सैनानी, अजय केले. प्रवीण पाठक, नरेंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, प्रकाश ताडे, सुरेश पवार, संजय विसपुते, नरेंद्र निकुंभ, महेश पाटील, चंदूसिंग परदेशी आदींची उपस्थिती होती.

gudi padwa 2023 New Year Swagat Yatra organized on behalf of Hindu Varsh Swagat Samiti jalgaon news
Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवावी जिल्हा बँक : अजित पवार

पाचोरा शहरातून संघाचे शिस्तबद्ध संचलन

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने हिंदू नववर्ष, पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पथसंचलन करण्यात आले. शहरातील मानसिंगका मील मैदानावर रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी गणवेशात एकत्रित येऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशमुखवाडी, बाहेरपुरा, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे पथसंचलन केले.

यात संघाच्या घोष पथकाने देखील सहभाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव विभागाचे कार्यवाहक अविनाश नेहते यांनी संघाची शिस्त, संघ संस्थापकांचा जन्मदिवस व कार्यप्रणाली, राष्ट्रीय सेवाभाव, जनसेवा, देश हित याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी पाचोरा तालुक्याची विभागणी करून संघदृष्ट्या पाचोरा व पिंपळगाव हरेश्वर असे दोन भागात विभाजन करून नव्याने कार्यकारिणी घोषित केली.

gudi padwa 2023 New Year Swagat Yatra organized on behalf of Hindu Varsh Swagat Samiti jalgaon news
Market Committe Election : जळगाव बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com