Jalgaon Accident News : सुसाट केमिकल टँकरची धडकेत शेतकऱ्यासह म्हशीचा मृत्यू

Relatives, village women wailing near the dead body.
Relatives, village women wailing near the dead body.esakal

Jalgaon Accident News : विटनेर (ता.जळगाव) येथील नेरी- म्हसावद रस्त्यावरुन एरंडोलच्या दिशेने सुसाट वेगात जात असलेल्या केमिकल टँकरने रस्ता ओलांडत असलेल्या म्हशीसह शेतकऱ्यास जोरदार धडक दिल्याची घटना घडली.

अपघातात म्हैस टँकरच्या पुढील चाकात अडकली तर, शेतकरी सुकलाल पंडीत सोनवणे (वय-५०) यांचा जागीच मृत्यू झाला.(chemical tanker collision farmer and buffalo dead jalgaon accident news)

अपघात घडताच संपूर्ण विटनेरवासीयांनी अपघातग्रस्त टँकरला घेराव घालत रस्ता रोको केल्याने तीन-चार तास वाहतूक ठप्प झाली होती. केमिकल टँकर पेटवून देण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसंह शीघ्र कृती दलाचा ताफा घटनास्थळावर पाचारण करण्यात आला.

घटनास्थळावर उपस्थित बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील नेरी-म्हसावद रस्त्यावर आज मंगळवारी (ता.१९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शेतकरी सुकलाल पंडीत पाटील (वय-५०) चराईला गेलल्या म्हशी घेऊन घराकडे परतत होते.

नेरीकडून सुसाट वेगाने विटनेरमार्गे एरंडोलकडे केमिकल घेऊन जात असलेल्या (जीजे १२ बीव्ही ७४७५) टँकर चालकाने म्हशीसह रस्ता ओलांडणाऱ्या शेतकरी सुकलाल सोनवणे यांना जोरदार धडक दिली.

शेतकऱ्यासह म्हशीचा मृत्यू

या अपघातात एक म्हैस टँकरच्या पुढील चाकांमध्ये अडकून मृत्युमूखी पडली. तर, सुकलाल सोनवणे यांनाही जबर धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला. एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. अपघात घडताच ग्रामस्थांनी रस्त्याच्या दिशेने धाव घेत टँकरला घेराव घातला.

Relatives, village women wailing near the dead body.
Jalgaon Accident News : ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा महामार्गावर रास्ता रोको

सोनवणे कुटूंबीयांना अपघात झाल्याचे कळताच नातेवाईकांसक संपूर्ण कुटूंब घटनास्थळी पोहचले. सुकलाल सेानवणे यांचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला.

टँकर अडकल्याने..

टँकर इतक्या वेगात होते की, सुकलाल सोनवणे यांच्या म्हशीला टॅकरन धडक दिल्याने म्हैस मेल्यानंतर ती, चाकाखाली येवून चिरडली गेली व पुढच्या देान्ही चाकांमध्ये अडकून टँकर थांबले. इतक्यात ग्रामस्थांनी टँकरला घेराव घातल्याने चालकाला पळून जाता आले नाही.

पोलिसांना घटनेची माहिती कळाल्यावर उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह म्हसावद औटपोस्टचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ॲम्बुलन्स बोलावून मृतदेह रुग्णालयात पाठवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास विरोध करत रस्ता रोको केले.

Relatives, village women wailing near the dead body.
Jalgaon Accident News : भऊरजवळ डिव्हायडरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

टँकर पेटवण्याचा प्रयत्न

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे कळताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे इतर कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरल्यावर उपविभागीय पोलिस अधीकारी संदीप गावीत यांच्यासह इतर अधिकारी आणि शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संतप्त ग्रामस्थानी टँकरला घेरावर घालून रस्ता अडवून धरल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुमारे तीन-चार तास ठप्प झाली होती.

कुटुंबीयाचे नुकसान

प्रत्येकी दोन लाखाची एक म्हैस आणि कुटूंबाचा कर्ता पुरुष मृत झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता. नुकसान भरपाईसाठी ग्रामस्थांनी मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस प्रशासनासह वाहतूक जागेवर थांबून होते.

Relatives, village women wailing near the dead body.
Jalgaon Accident News : नांद्रा येथील तरुणाचा पुण्यात अपघातात मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com