Jalgaon News : जन्मदात्याकडून बालिकेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

Jalgaon News : जन्मदात्याकडून बालिकेचा विनयभंग

जळगाव : तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बापाने विनयभंग केला. सोमवारी (ता. १३) सायंकाळी सातला अल्पवयीन मुलीचे वडील (Father) घरी आले. (Child molestation by father jalgaon news)

त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरात अभ्यास करीत होती. तिच्या वडीलांनी तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. घराबाहेर काम करत असलेली आईने घरात धाव घेऊन मुलीला सोडविले.

त्यानंतर पीडितेसह तिच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात नराधम बापाविरोधात तक्रार दिली. त्यावरून रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस