
Jalgaon News : खडी ढीगाऱ्यावर दुचाकी आदळून महिला ठार
जळगाव : तरसोद फाट्याजवळ महामार्गावरील (Highway) खडीच्या ढीगाऱ्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. (Woman killed after two wheeler hit gravel pile On highway near Phata jalgaon news)
ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री दहाला घडली. शिला हिरामण राठोड (वय ५१, रा. फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
शिला राठोड मंगळवारी (ता. १४) मुलगा तुषार हिरामण राठोड (वय २३) याच्यासोबत दुचाकीने खासगी कामानिमित्त भुसावळला गेल्या होत्या. काम आटोपून दोन्ही मायलेक जळगावला परतण्यासाठी दुचाकीने निघाले. तरसोद गावाजवळ महामार्गाचे काम सुरू आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
त्यामुळे आजूबाजूला खडी व मातीचे ढीग आहेत. राठोड यांची दुचाकी रात्री खडी व मातीच्या ढीगाऱ्यावर आदळली. त्यामुळे मायलेक फेकले गेले. शिला राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुषार राठोड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
बुधवारी (ता. १५) सकाळी दहाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांची प्रचंड गर्दी झाली होती. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.