Latest Marathi News | चोपड्याच्या चोरट्यांकडे नाशिकच्या दुचाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : चोपड्याच्या चोरट्यांकडे नाशिकच्या दुचाकी

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. गणेश ऊर्फ घनशा शिलदार बारेला (वय २४, रा. कर्जाणे, ता. चोपडा) व लखन ऊर्फ टारझन सुरेश बारेला (२२, रा. अजगिऱ्या, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या संशयितांकडून चोरीच्या तीन दुचाकींसह अटक केली आहे.

गणेश बारेला आणि लखन बारेला चोरीच्या दुचाकी चोपडा शहर व परिसरात विकत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली.(Chopda thieves Rides in nashik two wheeler Jalgaon Crime News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Jalgaon : भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेनेतर्फे निषेध व जोडे मारो आंदोलन

त्यांच्या पथकातील सूरज पाटील, परेश महाजन, रवींद्र पाटील, राहुल बैसाणे, दीपककुमार शिंदे, प्रमोद ठाकूर यांनी कर्जाणे गावात सापळा रचून दोघांना शिताफीने अटक केली.

चोपडा शहर व नाशिकच्या सातपूर परिसरातून आपण दुचाकी चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. संशयितांना चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा: Jalgaon : जामदा ग्रामस्थांचे अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत नसल्याने रौद्र रुप