चोपडा पं. स. सभापतिपदी कल्पना पाटील | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्पना पाटील : कल्पना पाटील

जळगाव : चोपडा पं. स. सभापतिपदी कल्पना पाटील

चोपडा : चोपडा पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार यांनी राजीनामा दिल्याने गुरुवारी (ता. १८) सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात, सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या कल्पना दिनेश पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या. तर उपसभापती पदासाठी भरत बाविस्कर, पल्लवी भिल्ल, सूर्यकांत खैरनार या तीन सदस्यांनी अर्ज दाखल केले. पल्लवी भिल्ल यांनी माघार घेतल्याने उपसभापती पदासाठी

भरत बाविस्कर, सूर्यकांत खैरनार या दोघांमध्ये निवड प्रक्रिया झाली. यात सूर्यकांत खैरनार यांना ११ पैकी ६ सदस्यांनी हात उंच करून मतदान केले. त्यानुसार उपसभापतिपदी सूर्यकांत खैरनार यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावीत यांनी काम केले. सूर्यकांत खैरनार यांना अमिनाबी तडवी, मालुबाई कोळी, कल्पना पाटील (सर्व राष्ट्रवादी) तर पल्लवी भिल (भाजप) तर शिवसेनेचे एम. व्ही. पाटील यांनी मतदान केले. बिनविरोध झालेल्या सभापती कल्पना पाटील या मतदानपासून दूर राहिल्या.

हेही वाचा: नांदेड : शेतकऱ्यांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

भाजपच्या सदस्यांनी सभागृह सोडले :

प्रतिभा पाटील, भूषण भिल्ल, आत्माराम म्हाळके, भरत बाविस्कर यांनी सभागृह सोडून मतदानावर बहिष्कार टाकला. पल्लवी भिल यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान केले. तर रामसिंग पवार हे गैरहजर होते. भाजपचे उपसभापती पदाचे उमेदवार भरत बाविस्कर यांच्या पराभव करणारे राष्ट्रवादीचे निवडून आलेले उपसभापती सूर्यकांत खैरनार हे बाविस्कर यांना सूचक होते हे विशेष. निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी अव्वल कारकून पंकज शिंपी, अधीक्षक जे. एम. जाधव, व्ही. एस. बोढरे यांनी सहकार्य केले.

"ठरल्याप्रमाणे भाजपने शब्द न पाळता आमच्या नेत्यांवर दबाव आणून माझा उपसभापती पदाचा राजीनामा घेतला. त्याचा आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या सदस्यांना राग येऊन राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी बंड करत मला भाजपच्या उमेदवाराविरोधात उपसभापती म्हणून निवडून दिले. यावेळी मला शिवसेनेचे एम. व्ही. पाटील यांनीदेखील मतदान करून साथ दिली."

-सूर्यकांत खैरनार, नवनियुक्त उपसभापती.

loading image
go to top