शेतकऱ्यांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी प्रशिक्षण नावाने
शेतकऱ्यांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

नांदेड : शेतकऱ्यांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

नांदेड : कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी खुर्द (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्यांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम बुधवारी (ता.१७) झाला. प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. देवीकांत देशमुख यांनी उतिसंवर्धित केळी लागवड व प्रक्रिया, भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन, सेंद्रिय शेती तसेच परस बाग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

हेही वाचा: अकोला : उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ची सरशी

प्रा. माणिक कल्याणकर यांनी भाजीपाला पिकातील कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठा यांचा वापर यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात उपस्थित प्रशिक्षणार्थींना परसबाग भाजीपाला कीट व सेंद्रिय निविष्ठा सोबतच विविध कृषी विस्तार साहित्यचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री. शिरफुले, मंडल कृषी अधिकारी चातरमल, व आत्मा अर्धापूर तंत्र व्यवस्थापक सचिन आवरे, कृषी सहाय्यक श्रीमती कालिंदी व लहान लोन परिसरातील प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top