Jalgaon News : चोपडा कारखान्याकडून उसाला सव्वीसशेचा भाव

खानदेशात सर्वांत जास्त भाव असल्याचे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Chopra Cooperative Sugar Factory.
Chopra Cooperative Sugar Factory.esakal
Updated on

Jalgaon News : चोपडा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवत असलेल्या बारामती ॲग्रो युनिट ४ ने २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन २६०० रुपयांचा भाव जाहीर केला असून, खानदेशात सर्वांत जास्त भाव असल्याचे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यंदाच्या हंगामाच्या सुरवातीला २३०० रुपये उसाला भाव देण्यात आला होता. परंतु त्यात ३०० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे गुळवे यांनी सांगितले. (Chopra Sugar Factory has announced sugarcane price of Rs 2600 per ton for season jalgaon news)

वाढीव तीनशे रुपयांपैकी १५० रुपये हे गाळप हंगाम संपल्यावर तर उर्वरित १५० रुपये हे दिवाळीच्या वेळेस ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर यंदाचा गळीत हंगाम १६ फेब्रुवारीपासून बंद होणार आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक असेल त्यांनी त्वरित कारखाना साईटवर ऊस आणावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सुभाष गुळवे म्हणाले, की यंदा २०२३-२४ चा हंगामात फक्त १ लाख ६ हजार टन उसाचे क्रशिंग झाले असून, कारखाना तोट्यात सुरू आहे.

अरुणभाई गुजराथी यांच्या आग्रहाखातर हा कारखाना भाड्याने घेतला असून, ‘बारामती ॲग्रो’चे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी गुजराथी यांना दिलेला शब्द पाळत आहेत. कारखाना करारानुसार चालत आहे. त्यामुळेच ‘बारामती ॲग्रो’ने आतापर्यंत ६० कोटीपेक्षा जास्त खर्च केला आहे.

Chopra Cooperative Sugar Factory.
Jalgaon News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा स्थगित

काही जणांकडून राजकारण

सुभाष गुळवे यांनी सांगितले, की ‘बारामती ॲग्रो’ने आतापर्यंत ६० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. देखील येथील काही संचालक वैयक्तिक हितासाठी चोपडा साखर कारखान्याला विरोध करीत आहेत.

जाणीवपूर्वक राजकारण करीत आहेत. कारखाना चालायला नको अशीच त्यांची भूमिका आहे. त्या संचालकांना शेतकऱ्यांशी घेणे देणे नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देत नाही.

पण कितीही अडचणी आल्यात तरी देखील रोहित पवार यांच्या नेतृत्वात चोसाका हा सुरूच राहील. शेतकरी, कामगार यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Chopra Cooperative Sugar Factory.
Jalgaon News : वनविभाग देवझरी रेंजमध्ये तब्बल ३०० वृक्षतोड; 3 दिवसांतील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com