Jalgaon News : नागरिकांना मिळणार आता मोफत ई-शिधापत्रिका; कार्यवाही अखेरच्या टप्प्यात

एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
reshan card
reshan cardesakal

Jalgaon News : शिधापत्रिका काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते.

त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.(Citizens will now get free e-ration card jalgaon news)

मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत.

जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, तालुक्यात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

शिधापत्रिकांऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिका आता इतिहासजमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आली आहे. समाजातील गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली.

एका कुटुंबासाठी एक शिधापत्रिका दिली जात होती. कुटुंबातील लहान आणि मोठ्या व्यक्तींच्या प्रमाणात धान्य दिले जात होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजनांद्वारे धान्य दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य दिले जाते.

reshan card
Jalgaon Municipality News : सावधान...! रस्त्यावर दुचाकी पार्क करू नका जप्त होईल

अनेक कुटुंबे हे कामधंद्यानिमित्त मूळ गावी राहात नाहीत. त्यांची शिधापत्रिकेवर गावाकडचा पत्ता असे. त्यांना धान्यही गावाकडील स्वस्त धान्य दुकानात मिळत. मात्र, हे कुटुंब गावी राहात नसल्याने धान्य घेण्यासाठी त्यांना जाता येत नव्हते. शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता.

स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करत. या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली.

बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती. बारा अंकी क्रमांकानंतर कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून हाताचा ठसे देऊन धान्य घेता येत होते.

गोरगरिबांना सण, उत्सव साजरे करण्यासाठी ‘ आनंदाचा शिधा’ १०० रुपयांमध्ये दिला जात होता. ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाईन केले आहेत. त्यांनाच या योजनांचा लाभ मिळत होता. शिधापत्रिका काढून देताना काही दलाल नागरिकांची फसवणूक करतात.

reshan card
Jalgaon News : HIV सह जगणाऱ्यांना त्वरित रेशन कार्ड द्या; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. या ठिकाणी ही बनावट कागदपत्रे दाखल करता येणार नाहीत.

दृष्टीक्षेपात अमळनेर तालुका

* एकूण शिधापत्रिका : ६५ हजार ८०२

* अंत्योदय योजना : ८ हजार ८९८

* प्राधान्य कुटुंब योजना : ४२ हजार १९०

* केशरी १४ हजार ७१४

"शिधापत्रिकेची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. सध्या आम्ही नागरिकांना ई-शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करीत आहोत." - संतोष बावणे, पुरवठा अधिकारी, अमळनेर

reshan card
Jalgaon: इदगाह कब्रस्तान कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम बेकायदा! वक्फबोर्ड अध्यक्षांना थेट Emailद्वारे लेखी तक्रारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com