crime
crimeesakal

Jalgaon Crime News : प्रेमविवाहावरून 2 गटांत तुंबळ हाणामारी

प्रेमविवाह करण्यास आलेल्या मुलीकडील कुटुंबीयांचा मुलाकडील कुटुंबाशी वाद होऊन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.

Jalgaon Crime News : प्रेमविवाह करण्यास आलेल्या मुलीकडील कुटुंबीयांचा मुलाकडील कुटुंबाशी वाद होऊन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.

या प्रकरणी परस्परविरोधी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(clash between 2 groups over love marriage jalgaon crime news)

ही घटना शहरातील बाबूजीपुरा चौकात शनिवारी (ता. २३) घडली. यावल शहरातील बाबूजीपुरा चौकात चंदुलाल पंडित वानखेडे हे राहतात. त्यांच्या मुलासोबत प्रेमविवाह करण्यासाठी तरुणी शनिवारी (ता. २३) त्यांच्या घरी आली.

या मुलीच्या कुटुंबाकडील लोक त्यांच्या घरी आले व आम्हाला या मुलीला भेटायचे आहे व तिला घेऊन पोलिस ठाण्यात जायचे आहे, असे सांगत त्यांनी वाद घातला आणि दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली.

यात ३८ वर्षीय महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चंदुलाल वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भोई, रेखा भोई (दोघे रा. भुसावळ), लता नंदाने, दिलीप भोई, विनोद मोरे (तिघे रा. उल्हासनगर) व गिरीश भोई (रा. पाडळसे, ता. यावल) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Jalgaon Crime News : क्षुल्लक कारणावरून पत्नीचा निर्घृण खून; संशयितास अटक

तसेच दुसऱ्या गटाकडून रेखा भोई (वय ३८) या जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदुलाल वानखेडे, विशाल भोई, मोहन भोई, लोकेश भोई, रोहित भोई, कोमल भोई, माधुरी भोई व सुमनबाई भोई (सर्व रा. यावल) या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गटातील दोन फिर्यादीवरून तब्बल १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

crime
Jalgaon Crime News : बांभोरी पुलावर पोलिसांनी पकडला वाळूचा ट्रक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com