
धरणगाव : पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव) येथील एका शेतकऱ्याचा शेतरस्ता एकाने प्लॉट एनए करताना काबीज केला होता. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी जागेवर भेट देऊन ‘ऑन दी स्पॉट’ निर्णय घेत शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करून दिला.
पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव) येथील शेतकरी गुरुवारी (ता. १९) आपल्या शेतरस्त्याबाबत कैफियत घेऊन तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्याकडे आले होते. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी या रस्त्याचे स्थलनिरीक्षण केले. (Clear encroached farm road in half an hour On the spot decision Dharangaon tahsildar on action mode Jalgaon News)
यात सागर संजय अग्रवाल (रा.जळगाव) यांनी एनए केलेल्या क्षेत्रालगत शेतकऱ्यांचा जुना वहिवाट रस्ता बंद केला होता.
यामुळे शेतकऱ्यांचा वापर बंद झाला होता. या बाबीची पाहणी करून तहसीलदार देवरे यांनी सदर शेतकरी अग्रवाल यांना समजावत एका बांधावरील शेतकरी रुपचंद ठाकरे यांच्याकडून ४ फूट व सागर अग्रवाल यांच्या शेतातून ८ फूट असा १२ फुटाचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अवघ्या अर्ध्या तासात खुला करून दिला.
दोघांमध्ये समजोता झाल्याने तातडीने मार्ग काढणे सोपे झाले. शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार देवरे यांच्या तत्परतेचे व ऑन दि स्पॉट फैसल्याचे तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी तलाठी प्रशांत पाटील, कोतवाल राहुल शिरोळे व शेतकरी हजर होते.
समस्या सोडविण्यासाठी बांधिल : देवरे
या बाबत तहसीलदार देवरे यांनी सांगितले, की मला कालच या समस्येबाबत माहिती मिळाली आणि मी गुरुवारी जाऊन पाहणी केली. वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन दोघा शेतकऱ्यांना समजावून सांगितले व सामंजस्याने रस्ता खुला केला. शेतकरी बांधवांसाठी व समस्या सोडविण्यासाठी तहसील प्रशासन बांधिल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.