Jalgaon Maratha Survey : मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील कुटुंबीयांचे सर्वेक्षण सुरूच राहणार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यांसह विविध मागण्या शासनाने मान्य केल्या, तरी गेल्या बुधवार (ता. २३)पासून राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सुरू असलेले मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरूच राहील.
Collector Ayush Prasad
Collector Ayush Prasadesakal

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यांसह विविध मागण्या शासनाने मान्य केल्या, तरी गेल्या बुधवार (ता. २३)पासून राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सुरू असलेले मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरूच राहील. शासनाकडून सर्वेक्षण थांबविण्याचे आदेश नाहीत. यामुळे सर्वेक्षण ठरवून दिलेल्या कालावधीत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘सकाळ’ला दिली.

शासनाने शनिवारी (ता. २७) मराठा समाजाच्या सर्व मागण्या केल्याने मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. (Collector Ayush Prasad statement of will continue survey of Maratha community open category families jalgaon news)

त्यामुळे शनिवारी मराठा समाजातर्फे जल्लोष करण्यात आला. शासनाने मागण्या मान्य केल्याने सुरू असलेले सर्वेक्षण बंद होते का? अशी शंका सर्वांनाच होती. त्यावर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी वरील माहिती दिली. आरक्षणासाठी एक डेटा असावा लागतो.

यामुळे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षणाचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अनेक अडचणींचा सामना करीत प्रगणक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. अगोदर काही प्रगणकांचे अॅप अपलोड नसल्याने मोबाईल अॅप घेत नव्हते.

यामुळे त्यांना सर्वेक्षण करता आले नाही. मात्र आता अॅप चांगले सुरू असून, सर्वेक्षणही लवकर होत आहे. १८४ मुद्दे भरताना अडचणी येतच आहे. मराठा समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील कुटुंबातील सर्वेक्षण करताना पाच ते सहा मिनिट लागतात.

मराठा समाजाच्या ज्या कुटुंबाकडे संबंधित जातीचे प्रमाणपत्र आहे, अशा कुटुंबाचे सर्वेक्षण करताना जास्त वेळ लागत नाही. मात्र ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही, अशा कुटुंबाकडे किमान अर्धा तासाचा कालावधी लागत आहे.

Collector Ayush Prasad
Maratha Reservation : ‘सकल’ मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव ; ढोल ताशांच्या गजरात जल्लोष

बंद घरांचे पुन्हा सर्वेक्षण

सर्वेक्षण करताना सकाळी नऊलाच प्रगणक संबंधित सर्वेक्षण करावयाच्या भागात जातात. काही घरी कुटुंब प्रमुख नसल्याने माहिती उपलब्ध होत नाही. संबंधित कुटुंबप्रमुख शेतात, कामावर बाहेर गेलेले असतात. यामुळे पुन्हा त्या घरी जाऊन माहिती भरावी लागत आहे.

१५४ प्रश्‍न

घरात किती जण शासकीय नोकरीला आहेत, सर्वांचे एकूण उत्पन्न किती, विमा किती जणांनी काढला आहे, शेती आहे का, नवीन शेती, घर विकत घेतले आहे का, घरी वाहने कोणती, शिक्षण कोणाचे किती झाले आहे. खासगी नोकरी किती जण करतात आदी प्रश्‍नांची उत्तरे कुटुंबप्रमुखांना द्यावी लागत आहेत.

सुटी असली तरी आज सर्वेक्षण

उद्या (ता. २८) रविवार सुटीचा दिवस असला तरी प्रगणक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ४३ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण करावयाचे आहे.

आतापर्यंत ३५ हजारांवर कुटंबाचे सर्वेक्षण झाले आहे. यामुळे ठरवून दिलेल्या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण होईल, अशी माहिती जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.

Collector Ayush Prasad
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर हरकती नोंदवा : छगन भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com