आता सातच्या आत घरात..विवाह, अंत्ययात्रेवर निर्बंध तर मोर्चा, आंदोलन, रॅलीला बंदी

आता सातच्या आत घरात..विवाह, अंत्ययात्रेवर निर्बंध तर मोर्चा, आंदोलन, रॅलीला बंदी

जळगाव ः गेल्या रविवारपासून ( ता.२८) सुरू झालेल्या लॉकडाऊन संपला. अन आजपासून नागरिक रस्त्यावर दैनंदिन व्यवहारासाठी रस्त्यावर आले. यामुळे बाजारपेठेसह सर्व ठिकाणी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांचा लॉकडाऊन जिल्ह्यात पाळला गेला. यामुळे सर्वांचेच अर्थचक्र थांबले होते. हातावर पोटा असलेल्यांचे तर हाल झाले. आता दैनंदिन व्यवहार सुरू झाल्यानंतर नागरिकांनी बाजारपेठा, व्यापारी संकुलात विविध साहित्य घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. 

काहींनी भाजीबाजारासोबतच सोने चांदीच्या दूकानातूही खरेदी केली. सध्या सोन्याचे दर कमी झाल्याने कमी दरात सोने खरेदीचा आनंद काहींना घेण्यास सुरवात केली आहे. तर काहींनी उन्हाळ्यासाठी खास खादीचे कपडे, सुती कपडे, गॉगल, टोप्या, हातरुमाल आदी वस्तूंची खरेदी सुरू केली. उन्हापासून बचावासाठी विविध प्रकारचे क्रीम्सचही घेतले आहे. 

साडेतिनशे कोटींचे नुकसान 
तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे सोने, चांदी बाजार, कापड मार्केटसह इतर व्यापारी संकुलातील सुमारे साडेतिनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. एकप्रकारे अर्थचक्रच थांबले होते. आता ती पूर्ववत सुरू होण्यास बराच दिवसांचा अवधी लागणार आहे. 

आता सातच्या आत घरात.. 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन आदेश काढून आता सर्व दुकाने (अत्यावश्‍यक सेवा वगळता)सायंकाळी सातला बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर रात्री दहा ते सकाळी सात पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क फिरण्यावरही दंड आकारला जाणार आहे. 

हे राहतील सुरू… 
* भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहील 
* कृषी उत्पन्न बाजार समित्यांत शेतकरी, घाऊक विक्रेत्यांना प्रवेश 
* भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत सुरू ठेवता येतील. 
* सर्व दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच सुरू राहील. 
* हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रुम/बार सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येतील. 
* रात्री दहापर्यंत पार्सल सेवा देता येईल. 

यावर असेल बंदी... 
* सर्व आठवडे बाजार बंद राहतील. 
* सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस 
* मात्र ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व 
व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित रहावे. तथापि इयत्ता १० वी १२ वी बाबतीत पालकांचे संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. 
* अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेत सुरू राहतील. 
* सर्व सिनेमागृहे, मॉल, मनोरंजन पार्क, बगीचे, नाटयगृह, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहतील. 
उल्लंघन करणा-या प्रति व्यक्‍तींकडून रुपये १० हजार दंडाची आकारणी होईल. 
* सर्व क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद 
* जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक हे राज्यस्तरीय/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. 
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, समारंभ, यात्रा, दिंडया, ऊरुस धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंदच राहतील. 
* अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ २० लोकांनाच उपस्थित राहता येईल. 
* लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, मोकळया ठिकाणी लग्न समारंभ, इतर कार्यक्रम बंद 
* लग्न समारंभ व इतर समारंभ हे केवळ २० लोकांच्या उपस्थितीत आवश्‍यक राहील. 
* कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ ५ लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील. 
* निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी राहील 
* सर्व खाजगी आस्थापना, कार्यालये क्षमतेच्या ५०% क्षमतेसह सुरु राहतील. 

अशा प्रकारे होईल दंड... 
* विनामास्क आढळल्यास प्रती व्यक्ती ५०० रूपये 
*सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्‍तींना १ हजार 
* गर्दी करणा-या प्रति व्यक्‍तींना रुपये १ हजार 
* रात्रीच्या संचारबंदीत ५ व्यक्ती एकत्र आल्यास १ हजार दंड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com