Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याची नासाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Water wastage in collector office

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याची नासाडी

जळगाव : ‘जल ही जीवन’, या आशयाखाली जिल्ह्यात एकीकडे पाणी वाचविण्यासाठी प्रबोधन केले जाते. मात्र, जिल्ह्याच्या मुख्यालयीच जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूस महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहालगत पाठीमागे जलवाहिनी तुटली आहे. जलवाहिनी तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, ते पाणी परिसरात साचत आहे. यामुळे कोशागार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल निर्माण होत असल्याचे चित्र आहे. (Collector Office Waste of water Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Jalgaon News : कडाक्याच्या थंडीत आदिवासी बालकांना मायेची उब; जिल्हाधिकारी आदिवासी पाड्यांवर

रेनवॉटर हार्वेस्टिंग

तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी जातीने उपस्थित राहून कार्यालयाच्या छतावरील पावसाचे पाणी परिसरात असलेल्या बोअरवेलमध्ये साठविण्याची व्यवस्था केली आहे.

रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे परिसरातील बोअरवेल पुनरुज्जीवित झाले असून, त्याचा उपयोग परसबागेसह अन्य झाडांना व स्वच्छतागृहासाठी पाणीपुरवठा म्हणून उपयोगात आणले जाते. पाणीगळतीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

हेही वाचा: Makar Sankrant News : राम - रहीमच्या पतंगाने घेतली उंच भरारी