Jalgaon News : कडाक्याच्या थंडीत आदिवासी बालकांना मायेची उब; जिल्हाधिकारी आदिवासी पाड्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: District Collector Aman Mittal and dignitaries while distributing warm clothes, goods and nutritious food to the tribal brothers, women and children in the remote padas of Satpura

Jalgaon News : कडाक्याच्या थंडीत आदिवासी बालकांना मायेची उब; जिल्हाधिकारी आदिवासी पाड्यांवर

जळगाव : आजच्या मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, समाजातील दातृत्व आदी मंडळी अतिशय दुर्गम पाड्यापर्यंत पोचली. तेथील आदिवासींच्या समस्या जाणून घेत त्यांना आवश्‍यक वस्तूही पुरविल्या.

सोबतच तीळगूळ व अन्य पदार्थांचे वाटप करत या वंचितांची संक्रांत खऱ्या अर्थाने ‘गोड’ केली. कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या पाड्यांवरील मुलांना स्वेटर, मोजे देऊन त्यांना मायेची उबही पुरविली.

समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दातृत्वाचा प्रत्यय देणाऱ्या व्यक्ती सण, उत्सवानिमित्त सातपुड्यातील आदिवासी पाडे असलेल्या दुर्गम भागात जातात आणि तेथील वंचित, उपेक्षित नागरिकांशी संवाद साधतात. त्याचाच भाग म्हणून रविवारी (ता. १५) मकरसंक्रांतीच्या पर्वावर हा उपक्रम राबविण्यात आला. (District Collector Aman Mittal and dignitaries distributing warm clothes goods nutritious food to tribal brothers women children in remote padas of Satpura Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Makar Sankranti News : रामतीर्थावर स्नानासाठी उसळली गर्दी

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडून संक्रांतीनिमित्त लंगडा आंबा, जामन्या, गाडऱ्या भागात रविवारी तीळगूळ, चिक्की, बिस्किट, लहान मुलांचे कपडे, स्वेटर, पायमोजे, महिलांना साड्या, स्वेटर, वृद्ध लोकांना स्वेटर वितरण करण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी करण्यात आली. वन विभागातील वृक्षारोपणाचा त्यांनी आढावा घेतला. लंगडा आंबा परिसरातील आदिवासी बांधवांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

आजवरच्या इतिहासात प्रथमच एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात प्रत्यक्ष येऊन समस्येवर चर्चा, आपुलकीने विचारपूस, तसेच संक्रांतीनिमित्त तोंड गोड करून कपडे वितरणाने आदिवासी बांधव भारावून गेलेत.

सुमारे २०० महिला, ३५० लहान मुले व वृद्ध यांना या पाड्यांवर विविध वस्तू, पदार्थ, कपड्यांचे वितरण करण्यात आले. या वेळेस यावल परिक्षेत्र वन संरक्षक, रावेरचे नायब तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik News : दिंडोरी, पेठ रोडवरील ब्लॅक स्पॉट जैसे थे