Jalgaon Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

Jalgaon Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

जळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (College girl molested Jalgaon Crime News)

हेही वाचा: Crime News : मूळ कसणाऱ्यांनी ठेवले पोटकूळ

पीडित विद्यार्थिनी शुक्रवारी (ता. ६) एका कॉलेजच्या परिसरात असताना, फारुख खान युनूस खान (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) आणि योगेश गजानन कुंवर (वाघनगर, जळगाव) या दोघांनी पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करून हातवारे करीत जवळ बोलावले.

नंतर पीडितेकडे तिचा मोबाईल नंबर मागत फोनवर बोलण्याचे सांगितले आणि तू माझ्याशी संबंध ठेव, असे बोलून विनयभंग केला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही संशयितांना अटक केली. उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : मुंबई नाका पोलिसांकडून लॅपटॉप चोरट्यास अटक