महाविद्यालयीन, विद्यापीठीय सेवक कृती समितीचे आंदोलन | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : महाविद्यालयीन, विद्यापीठीय सेवक कृती समितीचे आंदोलन

जळगाव : महाविद्यालयीन, विद्यापीठीय सेवक कृती समितीचे आंदोलन

जळगाव : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सह संचालक कार्यालय येथे महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले.

१२/२४चा आश्वासित प्रगती योजनेचा शासन निर्णय, अकृषी विद्यापीठातील ७९६ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची सुधारीत वेतन संरचना लागू करणे, ५८ महिन्यांची थकबाकी या महत्वाच्या प्रलंबित मागण्यासह इतर आवश्यक मागण्यांची दखल घेऊन शासनाने त्याची तत्काळ पूर्तता करण्यासाठी महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कृती समितीच्या माध्यमातून १६ नोव्हेंबर, २०२१ पासून अंदोलनास सुरूवात केली.

हेही वाचा: अकाेला : बदलत्या हवामानाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन करा

आंदोलनाचा दुसरा टप्पा

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात १३ व १४ डिसेंबरला विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या परिसरात साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी सह संचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी देवरे उपोषणस्थळी उपोषणास बसलेल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या मागण्या शासनापर्यंत आम्ही पोचवतो असे आश्वासन दिले. कृती समितीचे मुख्य संघटक तथा महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब त्रिभुवन यांच्यासह राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचे कार्यालयीन सचिव प्रमोद चव्हाण, विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राजू सोनवणे, पद्माकर कोठावदे, गोपाळ सोनवणे व भास्कर बानाईत यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.

Web Title: College University Servant Action Samiti Agitation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCollege
go to top