Jalgaon News : कौटुंबिक, भाऊबंदकीतील वाद समितीच सोडविणार; बैठकीत निर्णय

Community members and office bearers present at the Koli society meeting.
Community members and office bearers present at the Koli society meeting. esakal
Updated on

Jalgaon News : कोळी समाजातील कौटुंबिक वाद, तसेच भाऊबंदकीतील वाद न्‍यायालयात पोचत असतात. आता यापुढे वाद न्‍यायालयात न जाता समाजाच्‍या समितीमार्फतच सोडवून इतर समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असा निर्णय श्री महर्षी वाल्मीकी समिती व कोळी महासंघाच्‍या संयुक्‍त बैठकीत घेण्यात आला. (committee will resolve dispute in family brotherhood Koli Federation Sri Maharishi Valmiki Committee meeting decision jalgaon news)

वाल्मीकनगरातील बिंदूबाई सोनवणे मंगल कार्यालयात झालेल्‍या बैठकीस कोळी महासंघाचे राज्य युवक उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक भरत सोनवणे, नगरसेवक किशोर बाविस्कर, ॲड. रमाकांत सोनवणे, ॲड. गणेश सोनवणे, कोळी महासंघाचे महानगराध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे, कोळी महासंघाचे संपर्कप्रमुख सुभाष सोनवणे, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Community members and office bearers present at the Koli society meeting.
Jalgaon Municipal Corporation : नव्या रस्त्यांची ‘अंत्ययात्रा’ काढणारी शहरद्रोही यंत्रणा!

विमानतळ नामकरणासाठी पाठपुरावा करणार

जळगाव विमानतळाला ‘महर्षी वाल्‍मीकी’ यांचे नाव दिले आहे. मात्र, शासकीय पातळीवर पाठपुरावा होत नसल्‍याने अद्याप विमानतळाचे नामकरण झालेले नाही. यासाठी पाठपुरावा करावा. शिवाय शेळगाव बॅरेजला ‘महर्षी वाल्‍मीकी’ यांचे नाव देण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचेही निश्‍चित करण्यात आले.

गावात वादविवाह होत असल्‍याने काही समाजकंटक समाजातील मुलांना पुढे करून भांडणात अडकवतात. त्यांच्यावर गुन्‍हे दाखल होतात. यामुळे समाजातील तरुणांनी विवादाच्या भानगडीत न पडण्याचे आवाहनही या वेळी बैठकीत करण्यात आले.

Community members and office bearers present at the Koli society meeting.
Pachora Market Committee Election : बाजार समितीत खऱ्या भाजपसोबत युती : किशोर पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com