Jalgaon News: भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान; रेल्वे व्यवस्थापकांनी स्वीकारला सन्मान

Iti Pandey, Railway Manager accepting the Total Efficiency Shield for outstanding performance.
Iti Pandey, Railway Manager accepting the Total Efficiency Shield for outstanding performance.esakal

Jalgaon News : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात सोमवारी (ता. ३०) आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान केले.

विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या हस्ते हे शिल्ड स्वीकारण्यात आले. यात विभागातील सर्व विभागांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान प्राप्त झाला आहे. (Complete Efficiency Shield to present Bhusawal section jalgaon news)

अभियांत्रिकी विभागामार्फत २७८ किलोमीटर ट्रॅकवर रेल्वे नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. विभागातील २४ लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्यात आले. भादली, जळगाव, शिरसोली, म्हसावद, माहेजी आणि पाचोरा स्थानकाच्या ७२ किलोमीटर लूप लाइनचा वेग ताशी १५ किलोमीटरवरून ३० किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे.

चाळीसगाव ते धुळे या ५६ किलोमीटर लांबीचा वेग १०० किलोमीटर प्रतितासवरून ११० किलोमीटर प्रतितास करण्यात आला. प्रवाशांसाठी चार पादचारी पुलाचे (एफओबी) कार्य पूर्ण झाल्याने हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. विभागातील पुलांखालील ३२ नवीन आरयूबी रस्त्याचे काम पूर्ण होऊन सुरू झाले असून, त्यामुळे स्थानिकांची सोय झाली. एकूण मंजूर ३७९ पुलांपैकी १६३ पुलांच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे.

विभागातील वाहतूक गतिशीलता सुधारण्यासाठी, लूप लाइन विस्तार, लाइन क्षमता सुधारणा आदी एकूण २८ कामे चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी सात कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत.

Iti Pandey, Railway Manager accepting the Total Efficiency Shield for outstanding performance.
Jalgaon News : महापालिका संकुलातील गाळेभाड्याचे 129 कोटी थकीत; प्रशासन ढिम्म

उर्वरित २१ कामांपैकी सात कामे या वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. इगतपुरी-बडनेरा विभागाचा वेग ताशी ११० किलोमीटरवरून १३० किलोमीटर करण्यात आला आहे. या कार्यासाठी अभियांत्रिकी विभागाला महाव्यवस्थापकांकडून शिल्ड मिळाली आहे.

परिचालन विभागाकडून जळगाव ते भुसावळ ही २५ किलोमीटरची नवीन चौथी लाइन सुरू करण्यात आली आहे. ही लाइन पश्चिम रेल्वेला जोडण्यात आली. ज्यामुळे पश्चिम रेल्वेकडे येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुलभ झाली आहे. अमरावती स्थानकात २६ डब्यांच्या तपासणीसाठी पीट लाइनच्या विस्तारीकरणासह यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण झाले.

शिरसोली स्थानकाची डाउन लूप लाइन ७५३ मीटरने वाढविण्यात आली आहे. नांदुरा, अस्वली, बोरगाव स्थानकांवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात आले. मूर्तिजापूर येथे पूर्ण लांबीची मालवाहू गाडी बसविण्यासाठी यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात आले आदी उत्कृष्ट कामांसाठी शिल्ड देण्यात आली आहे.

Iti Pandey, Railway Manager accepting the Total Efficiency Shield for outstanding performance.
Jalgaon News : शहरात एकाचवेळी 15 ठिकाणी 15‘टीम'द्वारे रस्त्यांची कामे; 100 कोटींच्या कामांचे कार्यादेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com