जळगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत १५ प्रकरणांमध्ये तडजोड

१७ लाख ३९ हजार ८८७ रुपये वसूल करण्यात आले
Lokadalat
LokadalatSakal

धरणगाव - येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी (ता. ७) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी फौजदारी प्रलंबित ३४१ पैकी १५ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आले. सर्वच प्रलंबित प्रकरणात न्यायाधीशांनी तडजोड करण्यासाठी पक्षकारांना मार्गदर्शन केले. सामाजीक बांधिलकीबाबत प्रेरणा देऊन 1५ प्रकरणे तडजोड केले. या प्रकरणात १७ लाख ३९ हजार ८८७ रुपये वसूल करण्यात आले. बँकेची वादपूर्व ४९९ वसुली प्रकरणे दाखल होण्यापूर्वीच १३,७१,७५९ रुपये वसूल करण्यात आली. लोकअदालतीत अध्यक्ष म्हणून न्यायाधीश सु. दा. सावरकर, पंच न्यायाधीश ॲड. व्ही. एस. भोलाणे व ॲड. गणेश मांडगे, धरणगाव येथील विधीज्ञांनी सहकार्य करून लोकअदालत यशस्वी केली.

लोकअदालतीत येथील वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. संदीप सुतारे, सचिव शरद माळी, सहसचिव ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. राहुल पारेख, ॲड. गजानन पाटील, ॲड. मनोज जी. दवे, ॲड. सी. झेड कट्यारे, ॲड. गिरीश सी. कट्यारे, ॲड. राजेंद्र येवले, ॲड. अजय बडगुजर, ॲड. डी. ए. माळी, ॲड. संजय शुक्ला, ॲड. रिषभ शुक्ला, ॲड. आसीफ कादरी, ॲड. इजराईल, ॲड. कैलास मराठे, ॲड. कुलदीप चंदेल, ॲड. प्रदीप पाटील, ॲड. आर. एस. पाटील, ॲड. संदीप पाटील, ॲड. विक्रम परिहार, ॲड. एकनाथ पाटील, ॲड. संजय महाजन, विद्यार्थी विधीज्ञ अक्षय दवे व ॲड. प्रशांत क्षत्रिय आदींनी हजर राहून सहकार्य केले.राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी धरणगाव न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक जे. ओ. माळी, आर. एस. सैदाणे, विनोद सपकाळे, गणेश चौधरी, राजेश साळे, राहुल पाटील, ईश्वर चौधरी, दिनेश भोई, योगेश पाटील, एस. के. सपकाळे, डी. बी. सोनवणे, पी. एम. विसपुते, ए. आर. बाविस्कर, एस. पी. चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com