शिवाजीनगर पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या शुभारंभापासूनच वाद सुरू

अद्याप हा पूल पूर्ण झालेला नाही
Shivaji nagar bridge jalgaon
Shivaji nagar bridge jalgaonesakal
Updated on

जळगाव : शिवाजीनगर पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या शुभारंभापासूनच वाद सुरू आहे. अद्याप हा पूल पूर्ण झालेला नाही, आता शिवाजीनगर भागाकडील ‘टी’ आकाराचे काम सुरू करण्यासाठी इलेक्ट्रीक खांब हटवावे लागणार आहेत. मात्र आता त्यासाठी लागणाऱ्या निधीचा पुन्हा एकदा घोळाचा दुसरा भाग सुरू होणार आहे.

शिवाजीनगर पुलाचे काम सुरू करताना शिवाजीनगर ते केळकर मार्केटपर्यंतच्या मार्गावरील इलेक्ट्रीक खांब हटविण्याबाबत बराच वाद निर्माण झाला होता. हे खांब कोणी हटवायचे, त्यासाठी आवश्‍यक असणारा निधी कोणी द्यावयाचा, याचा वाद निर्माण झाला होता. अखेरीस महापालिकेने महासभेत शिवाजीनगर पुलाच्या कामाच्या मार्गात येणारे सर्व इलेक्ट्रीक खांब हटविण्यासाठी दीड कोटी रुपये निधी महावितरणसाठी मंजूर केला. तो निधी महापालिकेला देण्यात आला. त्यानंतर महापालिकेने या मार्गावरील पोल हटविले.

Shivaji nagar bridge jalgaon
पुणे : खडकवासला चौपाटीजवळ सुसज्ज वाहनतळाची गरज

दीड कोटीचा निधी झाला खर्च

महावितरण कंपनीने ‘टी’ आकाराच्या भागाकडील खांब वगळून ‘एल’ आकाराच्या मार्गावरील सर्व इलेक्ट्रीक खांब हटविले. त्यानंतर दीड कोटी रुपयांच्या राहिलेल्या याच निधीतून शिवाजीनगर पुलाजवळ महावीर जिनींगसमोरील डिपीवरून अंडरग्राउंड केबल टाकून शिवाजीनगरातील शंकर विजय सॉ मिलच्या कार्नरला डीपीला जोडण्यात आली आणि महापालिकेने आपले काम पूर्ण केल्याचे सांगितले.

‘टी’आकाराकडील खांबासाठी निधीचे काय?

महापालिकेने ‘टी’ आकारासह सर्व पुलाच्या कामातील सर्व पोल हटविण्यासाठी महावितरणला दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. महावितरण कंपनीने ‘टी’ आकाराच्या शिवाजीनगर भागाकडील इलेक्ट्रीक पोल हटविलेच नाही. तो निधी त्यांनी अंडरगाऊड केबल टाकण्यासाठी खर्च केला. आता शिवाजीनगरातील ‘टी’ आकाराच्या पुलाचा टी. टी. साळुंखे चौकापर्यंतच्या मार्गावर साधरणत: दहा खांब आहेत. आता हे खांब हटविण्यासाठी मात्र निधी नाही, त्यामुळे हे काम कसे होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने दिलेल्या निधीतून महावितरणने वेगळेच काम केले आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रीक खांब हटविण्याबाबत महावितरण व महापालिका वादाचा दुसरा भाग सुरू होण्याची शक्यता आहे. या वादात मात्र पुन्हा कामास विलंब होण्याची शक्यता आहे.

Shivaji nagar bridge jalgaon
चोऱ्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल हा कॅमेरा; किंमत फक्त....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com