Latest Marathi News | स्वयंपाक Gas Cylinderही चोरट्यांच्या Targetवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Cylinder Theft News

Jalgaon Crime News : स्वयंपाक Gas Cylinderही चोरट्यांच्या Targetवर

जळगाव : सिलिंडरच्या वाढत्या किमती परवडेनाशा झाल्याने चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह सिलिंडरही चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. पिंप्राळा हुडकोतील बंद घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह सिलिंडरसह शेगडी लंपास केली.

आशा रतनलाल जैन (वय ६०, रा. पिंप्राळा, हुडको) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान त्यांचे घर बंद होते. बंद घराची रेकी करून चोरट्यांनी घर फोडले. (Cooking gas cylinder is also target of thieves Jalgaon Crime News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची..

हेही वाचा: Jalgaon News : STच्या भंडार विभागात 2 लाखांचा अपहार

घरातील सोन्याचे दागिने, सिलिंडर व स्टीलची शेगडी, असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

तब्बल दहा दिवसांनंतर मंगळवारी (ता. २२) सायंकाळी पाचला त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सपकाळे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : व्यवस्थापकाचा कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला; संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना