esakal | हॉटस्पॉट ठरलेले स्मार्ट व्हिलेज..झाले कोरोनामुक्त !
sakal

बोलून बातमी शोधा

coronafree

हॉटस्पॉट ठरलेले स्मार्ट व्हिलेज..झाले कोरोनामुक्त !

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेत साकेगाव (ता. भुसावळ) येथे महिनाभरापूर्वी कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. या गावाने खबरदारी व स्वयंशिस्त पाळून कोरोनाच्या पहिल्या लाटेला वेशीवरच टांगले होते. परंतु दुसऱ्या लाटेत (corona second wave) थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर कोरोनाचा उद्रेक वाढला. यावेळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांची कोरोना चाचणी (corona test) करून घेतली. रुग्णसंख्या वाढत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. हे गाव कोरोनाचे अक्षरशः हॉटस्पॉट ठरले होते. ग्रामपंचायत (Gram Panchayat) पदाधिकारी, आरोग्य विभाग आपसात समन्वय साधून उपाययोजनांबाबत सुयोग्य नियोजन करून या महामारीवर (Epidemic) नियंत्रण मिळवत मात केली आहे. (corona hotspot smart village corona became free)

हेही वाचा: रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास म्युकरमायकोसिसचा धोका

स्वयंशिस्तीतून कोरोनावर मात
गावकऱ्यांनीदेखील स्वयंशिस्त पाळत जनजागृती केली होती. ग्रामपंचायतीने तीन ते चार वेळा गावात औषध फवारणी केली. गावातील प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिवाय शासनाच्या कोविड नियमांचे काटेकोर पालन केले. या सर्व उपाययोजनांमुळे गावाने कमी कालावधीत कोरोनावर मात केली आहे.


लसीकरणालाही चांगला प्रतिसाद

सुरुवातीला कोरोना लसीबाबत रहिवाशांमध्ये प्रचंड भीती होती. ही भीती दूर करण्यासाठी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने प्रबोधन केले. साहजिकच लस घेण्यासाठी लोक पुढे येऊ लागले. त्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.


नियमितपणे सॅनीटारायझेशन फवारणी

गाव कोरोनामुक्त रहावे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत सर्वत्र काळजी घेण्यात येत असून संपूर्ण गावात टँकर स्प्रेच्या साह्याने सॅनीटारायझेशन फवारणी करण्यात आली. प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सुभाष कोळी, सुरेश पाटील, सरपंच पती विष्णू सोनवणे, अशोक कोळी, अनिल सोनवाल, ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे, गणेश कोळी, कुंदन कोळी, गजानन पवार,अनिल सोनवाल, पप्पू राजपूत, सागर सोनवाल, अशोक सोनवणे
आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: कारभारी त्रस्त..निधीअभावी अडचण; ग्रामविकासाचा खोळंबा

गावात ठिकठिकाणी हँडवॉश स्टेशनची उभारणी

स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे आजूबाजूच्या परिसरातील गोदावरी कॉलेज फार्मसी कॉलेज चैतन्य महाविद्यालय राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कर्मचारी व संस्थानिक तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गावात वावर आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता, ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून गावात जागोजागी हँडवॉश स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून, अधिक काळजी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने टँकर च्या साह्याने संपूर्ण गावात सॅनिटरायजेशन स्प्रे करून गाव पूर्णपणे पूर्ण कोरोनामुक्त रहावे, यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या कार्याचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा: कोरोनात सोन्याची चमक फिकी; कोट्यवधींची उलाढाल ठप्प


ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकजूट होऊन कोरोनविरुद्ध लढा दिला. त्यामुळे गावात आता कोरोना नियंत्रणात आला आहे. ग्रामस्थांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेत बाहेर निघताना मास्क लावणे, लक्षणे जाणवल्यास त्वरित उपचार करावा.
- आनंद ठाकरे, सरपंच साकेगाव ग्रामपंचायत