esakal | कोरोनात सोन्याची चमक फिकी; कोट्यवधींची उलाढाल ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

gold market

कोरोनात सोन्याची चमक फिकी; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भुसावळ : जळगावपाठोपाठ दुसरी मोठी सुवर्ण बाजारपेठ (Jalgaon gold market) म्हणून भुसावळची ओळख आहे. परिसरातील इतर तालुक्यांसह शेजारील राज्य असलेल्या मध्य प्रदेशातूनही याठिकाणी शुद्ध सोने घेण्यासाठी ग्राहक येथे येतात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन (coronavirus update) असल्याने सोने बाजारपेठही बंद आहेत. गेल्या दीड महिन्यात सोने बाजारात सुमारे कोट्यवधींची (lockdown impact) उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कारागीर आणि कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. (jalgaon-news-coronavirus-lockdown-gold-market-billions-traded-stalled)

हेही वाचा: रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्रेक वाढला असून, ‘ब्रेक दी चेन’ मोहिमेंतर्गत *Break the chain) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने त्यात सुवर्ण बाजारपेठदेखील बंद ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहरातील जवळपास ५० ते ६० सोन्याची दुकान बंद असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानांवर उपजीविका करणाऱ्या लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लग्नसराईचा हंगाम बुडाला

लग्नसराई आणि गुडीपाडवा, अक्षयतृतीया या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. गेल्या वर्षी कोरोनामुळे याच दिवसांत लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. यंदाही लग्नसराईतच लॉकडाउन असल्याने सुवर्ण बाजारपेठ ठप्प झाली आहे. गेल्या दोन वर्षांत सोने खरेदीचा सिझन बुडाल्याने सुवर्ण व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून आपली आस्थापने थाटली आहेत. मात्र, व्यवसाय होत नसल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणार तरी कसे, असा प्रश्‍न आता उभा ठाकला आहे.

हेही वाचा: काळ नव्हता; पण वेळ खराब होती

कारागिरांची उपासमार

भुसावळला बाराही महिने सुवर्ण बाजारपेठेत गर्दी दिसते. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून झालेल्या लॉकडाउनमुळे याचा मोठा आर्थिक फटका बाजारपेठेला बसला आहे. शहरात ५९ ते ६० सोने-चांदी विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानात शंभरच्या वर कारागीर दागिने घडविण्याचे काम करीत आहे. तसेच इतरही कर्मचारी आहेत. मात्र, उलाढाल ठप्प झाल्यामुळे या सर्वांची उपासमार होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुवर्ण व्यावसायिकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. दुकाने बंद असली तरी कामगारांचे पगार आणि इतर खर्च हा द्यावाच लागत आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे.

- दीपक अग्रवाल, सुवर्ण व्यावसायिक, भुसावळ