एरंडोल तालुक्यात कोरोना बळींची 'सेंचूरी'

एरंडोल तालुक्यात कोरोना बळींची 'सेंचूरी'
Updated on

एरंडोल : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, तालुक्यात कोरोना बळींची संख्या शंभर झाली आहे, तर दुसरीकडे तीन दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत असल्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. 


तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजार ६३३ असून, तीन हजार ७३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात कोरोना बळींची शंभरी पूर्ण झाल्यामुळे प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मागील तीन दिवसांत कोरोनाचे नवीन १४१ रुग्ण आढळले असून, १७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात ६५६ रुग्ण गृहविलगीकरणात असून, जळगाव येथील शासकीय रुग्णालयात ३३, धुळे येथे एक, जळगाव येथे खासगी रुग्णालयात १९, पाचोरा येथे खासगी रुग्णालयात १०, एरंडोल येथे खासगी रुग्णालयात २०, एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात २३, तर कोविड सेंटर येथे ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात ११०, तर ग्रामीण भागात ९३ कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी खंडित करून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रसासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

अफवा पसरू नये

प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या कार्यालयात तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची बैठक झाली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. कोरोना रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत माहिती दिली. रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत असून, नागरिकांनी खोट्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

लक्षणे जाणवल्यास तत्काळ तपासणी करा

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, नर्स रुग्णांची पूर्ण काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रांताधिकारी विनय गोसावी, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख व त्यांचे सहकारी शहरात फिरून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करून दिलासा देत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर रामलीला मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येत असून, पालिका कर्मचारी दररोज परिसराची साफसफाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाबत नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता कोणतीही लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com