esakal | साठ लाख खर्चू करूनही पाण्यासाठी भटकंती 
sakal

बोलून बातमी शोधा

साठ लाख खर्चू करूनही पाण्यासाठी भटकंती 

नवीन जलवाहिनीला पालिकेने कार्यान्वित करावे, अशी मागणी होत आहे. या समस्येवर पालिकेने गांभीर्याने लक्ष घालून योग्य नियोजन करण्याची गरज आहे

साठ लाख खर्चू करूनही पाण्यासाठी भटकंती 

sakal_logo
By
Team eSakal

फैजपूर : शहरातील मिल्लतनगरमध्ये ६० लाखांची जलवाहिनी टाकून एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही जलवाहिनी कार्यान्वित केली जात नसल्याने ऐन उन्हाळ्यात व आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या पवित्र रमजान महिन्यात या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेने नवीन जलवाहिनी त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


शहरातील मिल्लतनगर परिसरात अवघ्या दहा वर्षांत नवीन वसाहत नावारूपाला आली. त्या दृष्टीने पालिकेने या भागात नावापुरत्या अत्यावश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. नंतर मात्र ही वस्ती रस्ते, गटारी आदी सुविधांपासून कोसो दूर आहे. मिल्लतनगरमध्ये नियोजनाअभावी पाणी समस्या तीव्र बनली आहे. पालिकेने गेल्या वर्षी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ६० लाख रुपये खर्च करून जलवाहिनी टाकली आहे. वर्ष उलटूनही नियोजनाअभावी पालिकेकडून मिल्लतनगरमधील नवीन जलवाहिनी कार्यान्वित होऊ शकलेली नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्यात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या पवित्र रमजान महिन्यात या भागातील नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागणार आहे. नवीन जलवाहिनीला पालिकेने कार्यान्वित करावे, अशी मागणी होत आहे. या समस्येवर पालिकेने गांभीर्याने लक्ष घालून योग्य नियोजन करण्याची गरज आहे. 


मिल्लतनगरमध्ये जलवाहिनी टाकून वर्ष झाले. तरीही त्यावरून पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याने इतरत्र पायपीट करावी लागते. 
-सय्यद मिस्तरी, रहिवासी, मिल्लतनगर 

योग्य नियोजनाअभावी मिल्लतनगरमधील रहिवाशांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. पालिकेने त्वरित लक्ष घालून नवीन जलवाहिनी कार्यान्वित करावी. 
-अकिलखान बशारतखान, रहिवासी, मिल्लतनगर 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image