
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या पाच दिवस शंभरीपार रुग्णसंख्या येत आहे.
बापरे ! बँकतील कर्मचाऱ्यांना झाला कोरोना; आणि शहरात उडाली एकच खळबळ
जळगाव ः जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीयकृत एका बँकेतील कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॅाझेटिव्ह आल्याने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे जळगाव शहरातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चाललेली आहे.
आवर्जून वाचा- जळगाव शहर बनतेय पुन्हा ‘हॉटस्पॉट’*
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दूसरी लाट आली आहे. त्यात जळगाव शहरातील नेहरु चौकात असलेली एका राष्ट्रीयकृत बँकेचे संपूर्ण कर्मचारी कोरोनाबाधित झाले असल्याच्या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली. सकाळी बँक उघडण्याच्या वेळात बँक उघडली अर्धा तास होवून देखील बँकत एक ही कर्मचारी उपस्थित नव्हता, बँकेचा दरवाजा खुला आणि सुरक्षारक्षक देखील नसल्याने बँकेत येणारे ग्राहक हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. विचारपूस करण्यासाठी कोणी नसल्याने पून्हा ग्राहक जात होते. मात्र थोड्याच वेळात बँकेतील कर्मचारी पॅाझेटिव्ह आले असल्याचे माहिती समजताच बँकेत आलेले नागरिक व बँकेच्या आजूबाजुच्या परिसरातील व्यवसायिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
नंतर आले..सुरक्षारक्षक आणि कर्मचारी
काही वेळासाठी बँक रामभरोसे होती नंतर काही वेळानंतर सुरक्षारक्षक तसेच बँकेचे दोन कर्मचारी बँकेच्या प्रवेशद्वारा बाहेर उभे होते. महापालिका प्रशानाचे कर्मचारी येवून बँक व बाजूला असलेले एटीएमचे द्वार बंद करण्यात आले होते. याबाबत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता केवळ आठ कर्मचारी पॅाझेटिव्ह आले असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा- जळगाव जिल्हात राष्ट्रवादीत चिंता वाढली; खडसे पाठोपाठ मलिक, देसले कोरोनाबाधित
तर...कोरोनाचे रुग्ण वाढतील
ही बँक मुख्य बाजारपेठेत असल्याने बँकेत व्यवसायिकांचे पैसे काढणे ते भरणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गेल्या चार पाच दिवसात बँकेत आर्थिक कामानिमित्त आलेले ग्राहक व नागरिक बँकेतील कर्मचाऱ्यांशी संपर्कात आले. त्यामुळे संपर्कातील नागरिकांना देखील कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असून असे झाल्याने शहरात अजून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव होतेय हॅाटस्पॅाट
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या पाच दिवस शंभरीपार रुग्णसंख्या येत आहे. त्यात आठ दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची संवादयात्रा झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी जमा झाली होती. परंतू दोन दिवसापूर्वी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रादीचे नेते एकनाथ खडसे कोरोना बाधित झाले. तर शुक्रवारी राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक, योगेश देसले देखिल पॅाझिटिव्ह आल्याने अन्य पदाधिकारी देखील विलगिरणात गेले आहे.
Web Title: Corona Marathi News Jalgaon Bank Workers Corona Test Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..