esakal | जळगावकर सावधान ! शहरात कोरोनाचा विस्फोट 

बोलून बातमी शोधा

जळगावकर सावधान ! शहरात कोरोनाचा विस्फोट }

जवळपास दोन हजार ४१३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

जळगावकर सावधान ! शहरात कोरोनाचा विस्फोट 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे. शहरात बुधवारी दीडशेपेक्षा अधिक रुग्ण समोर आले, तर जिल्ह्यातील नव्या रुग्णांचा आकडा ३६३ एवढा होता. जळगावपाठोपाठ चाळीसगावातही संसर्ग वेगाने वाढत आहे. 

आवश्य वाचा- चाळीसगावात कोरोना एक्सप्रेस सुसाट; चार हजारांवर रुग्ण 
 

जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असून, आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडताना दिसत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने साडेतीनशेचा टप्पा ओलांडला. आजही ३६३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५९ हजार ५८५ झाली आहे. त्या तुलनेत केवळ १३७ रुग्ण दिवसभरात बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा ५६ हजार ४१६ वर पोचला आहे. बुधवारी जवळपास दोन हजार ४१३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र असून, आणखी चाचण्या वाढविण्याची गरज आहे. 

आवर्जून वाचा- दुर्दैवी घटना: व्याहीच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या विहिणीचा अपघातात मृत्यू 

 

आणखी दोन बळी 
गेल्या २४ तासांत भुसावळ तालुक्यातील ६४ व ७४ वर्षीय अशा दोन पुरुषांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा एक हजार ७९० झाला आहे. सर्वाधिक ३०८ मृत्यू जळगाव शहरातील आहेत. 

जळगाव शहर रेड झोन 
जळगाव शहरातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. सलग तिसऱ्या दिवशी दीडशेहून अधिक रुग्ण समोर आले. बुधवारी नव्या १६४ रुग्णांची भर पडल्याने शहरातील सक्रिय रुग्ण ८६९ झाले आहेत. चाळीसगाव ५३, चोपडा ३०, अमळनेर २४, पाारेळा १७, मुक्ताईनगर १८, बोदवड ९, एरंडोल ११, भुसावळ व जळगाव ग्रामीण प्रत्येकी ६, रावेर ८, पाचोरा, धरणगाव व भडगाव तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्ण आढळून आले. 

संपादन- भूषण श्रीखंडे