जळगावमध्ये होणार कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ 

देविदास वाणी
Wednesday, 6 January 2021

जिल्हा रुग्णालयात कोविडी लसीकरणासाठी तीन रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २५ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना यावेळी बोलाविले जाणार आहे.

जळगाव ः देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात कोविशिल्ड, को-व्हॅक्सीन लशींना आपत्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे १४ हजार आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना ही सर्वात अगोदर दिली जाणार आहे. याबाबतची रंगीत चाचणी (ड्राय रन) येत्या शुक्रवारी (ता.८) जळगाव जिल्हा रुग्णालयात होणार आहे.  

आवश्य वाचा- जळगावच्या वेशीवर दिसला बिबट्या; पण मृतावस्थेत  
 

केंद्र शासनाच्या सूचनेवरून कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा डेटा मागविण्यात आला होता. जिल्ह्यात कोरोना लसीकरण अगोदर आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना केले जाणार आहे. त्यासाठीचा डेटा जिल्हा रुग्णालयातर्फे संकलीत केलेला आहे. जिल्ह्यात अजून कोवीडची लस आलेली नसली तरी शासनाने जिल्हा रुग्णालयांना रंगीत तालीम घेण्याास सांगीतले आहे. त्यानूसार येत्या शुक्रवारी (ता.८) सकाळी आठपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरणाची रंगीत तालीम सुरू होईल. 

आवर्जून वाचा- खड्यांचा 'बर्थडे' तो ही चक्क केक कापून; कुठे? वाचा सविस्तर 

 

तालीमीसाठी ३ रूम व्यवस्थ 
जिल्हा रुग्णालयात कोविडी लसीकरणासाठी तीन रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २५ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना यावेळी बोलाविले जाणार आहे. आलेल्या व्यक्तींचा अगोदर पोलिसांच्या निगराणीतून जावे लागेल. नंतर पहिल्या रुममध्ये त्यांची नोंदणी होईल. तेथे शिक्षक असतील. ते संबंधित व्यक्तींची नोंद करून ती वैद्यकीय क्षेत्रातीलच आहे याची खात्री करेल. त्याची माहिती फीड करेल. दुसरा कक्ष ‘व्हॅक्सीनिशन रूम’ असेल. त्यात लशीकरण करण्याची तालीम होईल. तिसरा कक्ष निरीक्षण कक्ष असेल. त्यात अर्धातास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवून लशीचा त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे का किंवा नाही याची पाहणी केली जाईल. अर्धातासानंतर संबंधितांना घरी सोडण्यात येईल. 

 

येत्या ८ जानेवारीस कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम जिल्हा रुग्णालयात होईल. सकाळी आठपासून रंगीत तालीम सुरू होईल. पंचवीस जणांवर लसीकरणाची रंगीत तालीम होईल. आगामी आठ ते पंधरा दिवसात कोराना लशी जिल्ह्यात उपलब्ध होतील. 

डॉ.एन.एस.चव्हाण 
जिल्हा शल्य चिकीत्सक 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon corona drye run jalgaon district health department preparation