esakal | जळगावच टेंशन वाढवणारी बातमी; दिवसभरात पुन्हा 18 जणांचा बळी

बोलून बातमी शोधा

जळगावच टेंशन वाढवणारी बातमी; दिवसभरात पुन्हा 18 जणांचा बळी
जळगावच टेंशन वाढवणारी बातमी; दिवसभरात पुन्हा 18 जणांचा बळी
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मृतांची आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी १६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज अठरा जणांचा मृत्यू झाल्याने जळगाव जिल्ह्यची चिंता वाढली आहे. तर नवे एक हजार १४३ रुग्ण समोर आले व तर एक हजार ४० बरेही झाले.

जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कोरोना संसर्ग आजाराचा फैलाव वाढला आहे. दररोज अकराशे, बाराशे रुग्ण समोर येत आहे. मंगळवारी नव्या एक हजार १४३ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार १४३ झाली आहे. दिवसभरात एक हजार ४४ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा ९० हजार ५०४ वर पोचला आहे. जिल्ह्यात आज तुलनेत कमी चाचन्याचे अहवाल प्राप्त झाले. 6990 पैकी 1140 जन बाधित आढळले.

१८ जणांचा बळी

गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यात तीस व चाळिशीतील दोघा तरुणांसह १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जळगाव व जामनेर तालुक्यातील प’त्येकी चार, चाळीसगाव, जळगाव तालुका, रावेर तालुका प’त्येकी दोन, तर रावेर, चोपडा, भुसावळ, पाचोरा, पारोळा तालुक्याती प’त्येकी एक जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या एक हजार ८२७ झाली आहे.

जळगावात रुग्णवाढ कायम

दररोजच्या रुग्णवाढीत जळगाव शहराचा अव्वल क्रमांक आहे. मंगळवारी शहरात २९६ नवे रुग्ण आढळून आले. अन्य ठिकाणी असे आहे रुग्ण संख्या जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ- ९९, अमळनेर- ३१, चोपडा- ९०, पाचोरा- ४३, भडगाव- ४, धरणगाव- ५५, यावल- ३३, एरंडोल- ११, जामनेर- ५८, रावेर- ८३, पारोळा- ३८, मुक्ताईनगर- १९७, बोदवड- ५३, अन्य जिल्ह्यातील- ७.