चिंता वाढवणारी बातमी; जळगाव, भुसावळ शहरात कोरोना पून्हा वाढतोय !

सचिन जोशी
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यात नव्या ७० रुग्णांची नोंद होऊन एकूण आकडा ५६ हजार ५३८ झाली आहे. तर ५६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ६८६ झाला आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून गुरुवारी नव्याने ७० रुग्ण आढळून आले. जळगाव शहरासह भुसावळातही संसर्ग वाढत असून जळगावात २५ तर भुसावळला आज १६ रुग्ण आढळून आले. दिवसभरात बरे झालेल्यांचा आकडा ५६ असून आज सलग तिसऱ्या दिवशी एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही. 

आवश्य वाचा- 'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा ! 

जळगाव जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. चाचण्या कमी असतानाही रुग्ण वाढ होत असल्याने जळगाव शहरात चिंता वाढली आहे. गुरुवारी जिल्ह्यात नव्या ७० रुग्णांची नोंद होऊन एकूण आकडा ५६ हजार ५३८ झाली आहे. तर ५६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ६८६ झाला आहे. गुरुवारी रुग्ण अधिक आढळून आले असले तरी ते वाढलेल्या चाचण्यांचा परिणाम आहे. कारण, आज दिवसभरात सुमारे १४०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. 

असे आढळले आज रुग्ण 

जळगाव शहरात आज दिवसभरात २५ रुग्ण आढळून आले तर २४ बरे झाले. भुसावळात १६ नवे रुग्ण सापडले व १८ रुग्ण बरे झाले. जळगाव ग्रामीण ५, यावल ४, रावेर ६, चाळीसगाव ९ असे रुग्ण आढळले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon corona infection increased