esakal | कोरोना संसर्गामुळे अव्हाणी वाळू ठेका झाला बंद ! 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना संसर्गामुळे अव्हाणी वाळू ठेका झाला बंद ! 

अव्हाणी (ता. धरणगाव) येथील ३०० कुटुंबीयांत तब्बल ५० रुग्ण आढळून आले असून, तीन जण कोरोना संसर्गातून दगावले आहेत.

कोरोना संसर्गामुळे अव्हाणी वाळू ठेका झाला बंद ! 

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव  : महसुली उत्पन्नातील तूट भरून काढण्याच्या उद्देशाने लॉकडाउन संपताच वाळू ठेके सुरू करण्यात आले होते. मात्र, पूर्णवेळ ठेका न चालविताच ठेकेदाराकडून दोन वेळेस ठेका जमा करण्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठा वाळू ठेका  अव्हाणी (ता. धरणगाव) ग्रामपंचायतीने बंद पाडला आहे. पाणीपातळीत झालेली घट, तसेच ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून येत असल्याने ठेका बंद करण्याचे पत्र ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले आहे. 

आवर्जून वाचा- नियमांच्या शर्यतीत अडचणींचा ‘स्पीडब्रेकर’ 
 


लॉकडाउन शिथिल होताच जिल्‍हा प्रशासनाने जळगाव तालुक्यासह वाळूगटांचा अधिकृत लिलाव करून ठेके सुरू केले होते. जळगाव जिल्ह्यातील तीन हजार ५३४ ब्रास इतका मोठा वाळूसाठा असलेला ठेका ग्रामस्थांना कोरोनाची बाधा झाल्याने बंद पाडण्यात आला आहे. अव्हाणी सरपंचांनी १६ मार्चला जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, गिरणा नदीपात्रातून होणारा बेसुमार उपसा आणि त्यातून विहिरींची खालावलेली पाणीपातळी पाहता, भविष्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. अव्हाणी (ता. धरणगाव) येथील ३०० कुटुंबीयांत तब्बल ५० रुग्ण आढळून आले असून, तीन जण कोरोना संसर्गातून दगावले आहेत. अशा परिस्थितीत वाळू ठेक्यावर काम करणाऱ्या मजुरांमुळे गावात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढला असून, परिणामी गावाच्या सुरक्षेसाठी ठेका बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

आवर्जून वाचा- ना रश्शा‍चा खमंग...ना मिष्टान्नाचा मधुर सुगंध! 
 

सरेंडर की खेळी? 
अव्हाणी येथील वाळू ठेकेदाराने ठेका सुरू होताच वाळूमाफियांच्या जाचाला कंटाळून पाचव्या दिवशी ठेका सरेंडर केला हेाता. आता ग्रामस्थांनाच कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ठेक्यावर काम करणाऱ्या मजुरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ठेकेदाराने ठेका जमा (सरेंडर) केला की प्रशासनाने याची खात्री रात्री उशिरापर्यंत होऊ शकली नाही.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image