esakal | ‘जीएमसी’त पॉझिटिव्ह तर खासगीत ‘निगेटिव्ह’; कोरोना संशयितांच्या जिवाशी खेळ सुरूच ! 

बोलून बातमी शोधा

‘जीएमसी’त पॉझिटिव्ह तर खासगीत ‘निगेटिव्ह’; कोरोना संशयितांच्या जिवाशी खेळ सुरूच ! }

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चाचण्यांच्या अहवालातील या घोळामुळे रुग्णांना मोठा धक्का बसत आहे. या धक्क्यातून रुग्ण अर्धमेला होता.

‘जीएमसी’त पॉझिटिव्ह तर खासगीत ‘निगेटिव्ह’; कोरोना संशयितांच्या जिवाशी खेळ सुरूच ! 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : कोरोना चाचण्यांमधील घोळात कोरोना संशयितांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. मनपाने नमुने घेतल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तपासून आलेला अहवाल पॉझिटिव्ह निघाल्यानंतर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतानाच खासगी प्रयोगशाळेतून तपासणी केली असता, तो अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने रुग्णाला धक्काच बसला. 

आवर्जून वाचा- शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही, काय आहे गावाचे रहस्य 

अमरावतीत कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये कोरोनाचा बोगस पॉझिटिव्ह अहवाल देत असल्याचे रॅकेट समोर येऊन या प्रयोगशाळांचे परवाने रद्द केल्याची घटना ताजीच आहे. असे असताना जळगावातही अहवालांमधील घोळ समोर येत आहे. 

‘जीएमसी’त पॉझिटिव्ह 
शहरातील एका व्यावसायिकाने किरकोळ लक्षणे दिसून आल्यानंतर कोरोना चाचणी करायचे ठरवले. पालिकेच्या शासकीय तंत्रनिकेतनातील केंद्रावर २२ फेब्रुवारीस ॲन्टिजेनसाठी व ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी नमुने दिले. २५ तारखेस त्यांना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळविण्यात आले. त्यांनी अहवाल घेऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे ठरविले. 

खासगीत ‘निगेटिव्ह’ 
यादरम्यान सदर व्यावसायिकाने फॅमिल डॉक्टरला सांगितले असता, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याआधी खासगी प्रयोगशाळेतून तपासणीचा सल्ला दिला. त्यानुसार २५ फेब्रुवारीला एका खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यानंतर त्याचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे या दोघांपैकी नेमका कोणता अहवाल खरा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल 
व्यावसायिकाच्या बाबतीत घडलेल्या या घोळाची माहिती मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. संबंधित व्यावसायिकाने यासंदर्भात काही जणांशी साधलेल्या संवादाच्या क्लीप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 

आवश्य वाचा- कोलकतातील ही मंदिरे विश्वासाचे प्रतीक
 

घोळात घोळ 
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चाचण्यांच्या अहवालातील या घोळामुळे रुग्णांना मोठा धक्का बसत आहे. या धक्क्यातून रुग्ण अर्धमेला होता. नेमका काय घोळ आहे, हे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात नाही. 

‘लोड’ वाढल्याने घोळ 
याबाबत अधिक माहिती घेतली असता, अचानक वाढू लागलेल्या रुग्णांमुळे चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज हजारो नमुने तपासणीसाठी येत असताना प्रयोगशाळेची क्षमता मात्र मर्यादित असल्याने अनेक अहवाल प्रलंबित राहत आहेत. त्यातूनच अशा प्रकारचा घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती समोर आली.


संपादन- भूषण श्रीखंडे