जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्णांची संख्या झाली कमी

सचिन जोशी
Tuesday, 22 December 2020

सोमवारी जवळपास १९०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ४०१ झाली.

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे आता आयसीयू व ऑक्सिजनवर असलेल्या गंभीर रुग्णांची संख्याही घटून शंभराच्या आत स्थिरावली आहे. सोमवारी दिवसभरात दोघांच्या मृत्यूसह नवे ४६ रुग्ण समोर आले तर ३६ रुग्ण बरे झाले. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी दररोज नव्या बाधितांची संख्या कायम आहे. सोमवारी जवळपास १९०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ४०१ झाली आहे. तर ३६ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडा ५३ हजार ७२१वर पोचला आहे. दोघा मृत्यूसह बळींची संख्या १३१९ झाली असून मृत्यूदर २.३८ टक्क्यांवर कायम आहे. 

जळगावात संसर्ग सुरुच 
जळगाव शहरात दररोज होणारी रुग्णवाढ कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी शहरात २१ रुग्ण समोर आले, तर एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भुसावळ ६, चोपडा ५, पाचोरा व रावेर प्रत्येकी २, धरणगाव, यावल, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी १, पारोळा ३, चाळीसगाव ३ असे रुग्ण आढळून आलेत. 

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon critical patients low