कोरोनासह हृदयविकाराच्या आजाराची दाहकता वाढली 

कोरोनासह हृदयविकाराच्या आजाराची दाहकता वाढली 
Updated on: 

अमळनेर  : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा या भागात तर परिस्थिती जास्तच बिकट आहे. अमळनेरमध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करताना दिसून येत आहे. कोरोना चाचण्यांचा वेग वाढवला जातोय. मात्र, दुसरीकडे दवाखाने हाऊसफुल्ल झालेत. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहियेत. रुग्णालयांत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. 


मागील काही दिवसांत मृत्युदर वाढला आहे, हे मात्र नक्की. सोशल मीडियावर एकच संदेश जास्त फिरताना दिसून येत आहे, तो म्हणजे ‘भावपूर्ण श्रद्धांजली’. यात कोरोनाने बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. यातच हृदविकाराच्या घटनांमध्ये देखील वृद्धी झालेली पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीमध्ये नंबर लावावे लागत आहेत. सरकारी आकडे जरी कमी जास्त असतील. मात्र, स्मशानभूमीतील चित्र बोलके आहे. २९ मार्चला एकाच दिवशी शहरातील ताडेपुरा स्मशानभूमीत सायंकाळपर्यंत १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. 


नागरिकांनी, योग्य ती काळजी घेतली पाहिजे. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मानसिक दृष्ट्या खचून न जाता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी गृहविलगीकरणात राहून योग्य ते उपचार घ्यावेत. 
- डॉ. प्रकाश ताडे 
वैद्यकीय अधिकारी, अमळनेर  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com