
लसीकरण झाल्यानंतर महिनाभरात संबंधित व्यक्तीवर काय परिणाम होतात. विपरीत परिणाम झाले नाही तर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे.
जळगाव ः कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम देशात लवकरच सुरू होणार आहे. या अभियानानुसार जळगाव जिल्ह्याला पंधरा दिवसात लस येणार आहे माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली. त्यासाठी केंद्र शासनाकडून कोरोना लसीकरणाचे किट लवकरच जिल्ह्यात येणार आहे.
आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूका आल्या रंगात; भावी सरपंचांचा आखाडा तापला !
जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनावर येणाऱ्या लशीचे संशोधन पुणे झाले आहे. या लसीकरणाची चाचणी म्हणून उद्या (ता.२) नंदुरबारला लस दिली जाईल. आगामी पंधरा दिवसात जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे.
३२ हजार डोस येणार
लसीकरण झाल्यानंतर महिनाभरात संबंधित व्यक्तीवर काय परिणाम होतात. विपरीत परिणाम झाले नाही तर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात प्रथम ३२ हजार डोस येणार आहे.
कोरोना लसीकरण क्रमानूसार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच देशात लस उपलब्ध होण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना लसीकरणाचा क्रम अगोदरपासूनच ठरलेला आहे. लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर एका महिन्यानंतर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे.
आवर्जून वाचा- येणारे २०२१ हे वर्ष खगोल प्रेमींसाठी निराशा आणणारे व संधीची वाट पाहायला लावणारे असणार आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रथम लस
लसीकरण मोहिमेच्या क्रमात सर्वांत अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारला जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. सुमारे १६ हजार डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ, लॅब टेक्निशियन, असिस्टंट आदींची माहिती संकलित करण्यात आली आहे. ती राज्य शासन व केंद्र सरकारकडे पाठविली आहे.
आगामी पंधरा कोरोना लस येईल, असे संकेत आहेत. सर्व खासगी व शासकीय आरोग्याधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, इतर स्टाफला ही लस अगोदर दिली जाणार आहे. १६ हजार जणांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल.
-डॉ. एन. एस. चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक
संपादन- भूषण श्रीखंडे